
प्रबोधनकार ठाकरे व राज ठाकरे ( सौजन्य सोशल मिडिया )
Raj Thackeray : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज ठाकरे यांनी पोस्ट करत नेहमी प्रमाणे सर्वांचे लक्ष वेधले आहे , राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत असे म्हटले आहे तर सध्या सुरु असलेल्या सामाजिक परिस्थितीवर सुद्धा लक्ष केंद्रीत केले आहे समाजा मध्ये होत असलेला अतिउत्साहीपणा आणि गोंगाट प्रिय झालेले सण उत्सव यावर टिका केली आहे . या वर राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर मध्ये म्हणतात ” आज समाज अती उत्सवप्रिय आणि गोंगाटप्रिय झालेला असताना आणि धर्माच्या नावाखाली कुठल्याही अंधश्रध्दांना श्रद्धा म्हणायचं आणि त्यावर कोणी तार्किक प्रश्न विचारला की त्याला लगेचच हिंदू विरोधी ठरवायचं अशा काळात आमच्या आजोबांची आठवण जास्तच प्रकर्षाने येते” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे”
राजकारणामध्ये होत असलेल्या कुप्रथामुळे समाज अडकत असेल वाहत असेल , तर समाजाने वेळीच थांबायला हवं ? सध्या हे चित्र उलट दिसत आहे , राजकारणी मतासाठी लाचारासाठी संधी मिळेल तिथे झुकत आहे तर आज माझे आजोबा असते तर लेखणाच्या माध्यमातून या सर्व राजकारण्यावर लेखणीचे आसूड ओढले असते . जकारण्यांनी खरं तर समाज हा कुप्रथांमध्ये अडकत असेल आणि वाहवत जात असेल तर समाजाला थांबवायला हवं. पण सध्या चित्र उलटंच दिसतंय, स्वतःच्या मतांच्या लाचारीसाठी संधी दिसेल तिकडे झुकायला राजकारणी तयार होत आहेत. आज आमचे आजोबा असते तर त्यांनी या सगळ्यांवर लेखणीचे आसूड कसे ओढले असते हा विचार अनेकदा मनात येतो.
महाराष्ट्र ही संताची आणि प्रबोधकांरीची भूमी म्हणून ओळखले जाते , त्याच्या विचारावर महाराष्ट्र नेहमी चालत आला आहे , इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्राला एका तार्कीक गोष्टी कडे बघण्याची मोठी शक्ती आहे. तिचा लोप कधी होऊ नये अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
MNS Raj Thackeray News: पुणे ‘मनसे”त मोठे फेरबदल? ‘भाकरी फिरवून’ राज ठाकरे कोणाला देणार संधी?
महाराष्टातील लोकांची शक्ती वृद्धिंगत होत राहणे हीच आमच्या आजोबांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले .