Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालाजी चौक परिसरातील मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक; महापालिका प्रशासनाला दिला इशारा 

पाषाण-सूस रस्त्यावरील बालाजी चौक परिसरात मैलापाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी, शेवाळ आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2026 | 01:06 PM
बालाजी चौक परिसरातील मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक; महापालिका प्रशासनाला दिला इशारा 

बालाजी चौक परिसरातील मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक; महापालिका प्रशासनाला दिला इशारा 

Follow Us
Follow Us:
  • मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक
  • महापालिका प्रशासनाला दिला इशारा 
  • ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी
बाणेर : पाषाण-सूस रस्त्यावरील बालाजी चौक परिसरात सीएनजी पेट्रोल पंपासमोरील मुख्य ड्रेनेज लाइन गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार तुंबत आहे. त्यातून मैलापाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी, शेवाळ आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ही ड्रेनेज लाइन तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी पुणे महापालिकेकडे केली आहे.

ड्रेनेजमधून वाहणारे मैलापाणी उताराच्या दिशेने शुभतेज मंगल कार्यालयापर्यंत वाहत जाते. त्यामुळे रस्त्यावर शेवाळ साचून रस्ता निसरडा झाला आहे. तसेच खोलगट भागात मैलापाणी साचत असल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. याप्रकरणी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आहे. यावेळी निलेश जुनवणे, पांडुरंग सुतार, गोपाळ जाधव, अशोक मराठे, प्रेमनाथ उमप, राजेंद्र फुके, संदेश कांबळे उपस्थित होते.

बालाजी चौकातून दररोज पीएमपी बस, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी रहदारी असते. मुख्य रस्त्यावरच मैलापाणी पसरल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेकडून तत्काळ प्रत्यक्ष काम सुरू होऊन बालाजी चौक स्वच्छ व सुरक्षित व्हावा, अशी अपेक्षा पाषाणकर नागरिक व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा : गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक

पुण्यातील पाषाण येथील मुख्य बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. देखभाली अभावी तो जीर्ण झाला असल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याची तातडीने दखल घेऊन या बसथांब्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी गेल्या काही दिवसाखाली केली आहे. निम्हण यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. तसेच सुहास निम्हण यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Web Title: Residents in the balaji chowk area are troubled by the foul odor of sewage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • mns news
  • Pashan
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
1

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.