शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघातील प्रचारसभेत महिलेच्या डान्सच्या कार्यक्रमावरून राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
कोणीतरी आज एक व्हिडिओ क्लिप पाठवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या व्यासपीठावर एका भोजपुरी गाण्यावर महिला नृत्य करत असताना दिसत आहे. लोकांच्या मनोरंजनाकरता बाई नाचतेय. तेही भोजपुरी गाण्यावर. या व्यासपीठावरील पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा फोटो आणि नाव आहे. ही अशी लाडकी बहीण योजना आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. डोंबिवलीतील सभेत ते बोलत होते.
हेही वाचा-Akola Constituency: प्रकाश आंबेडकरांचा डाव फसला? अकोल्यातून वंचितच्या उमेदवाराची माघार
शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघातील प्रचारसभेत महिलेच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याची आज राज्यभर जोरदार चर्चा सुरू होती. तोकडे कपडे आणि अश्लील हावभाव असलेले हे नृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच त्याच व्यासपीठावरील पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. त्यावरून राज ठाकरे यांनीही “हीच का लाडकी बहीण योजना’ असं म्हणत सरकारवर टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने आज त्यांच्या अधिकृत खात्यावरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये एक नर्तिका अत्यंत अश्लील हावभाव करत डान्स असल्याचं स्पष्ट दिसतंय. या व्हिडिओतील पोस्टरवरून हा कार्यक्रम कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांचा असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तर याच पोस्टरवर मुख्यमंत्री यांचाही फोटो लावण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्राचा युपी बिहार करून ठेवला आहे, अशी टीका करण्यात आली होती.
हेही वाचा-Mahim Constituency Politics: सदा सरवणकरांनी घेतला निर्णय; माहीममध्ये तिरंगी लढत अटळ