Photo Credit- Social Media (अकोल्यातून वंचितच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला)
अकोला: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.राज्यभरातून अनेक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अशताच अकोल्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अकोला पश्चिम मतदारसंघातून वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्यामुळे अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्यानंतर हुसेन आणि काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जावेद जकेरिया यांच्या मुलीच्या लग्नातील हा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोच्या माध्यमातून हुसेन आणि साजिद खान पठाण यांच्यात दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसत आहे. त्यांच्यातील या सहमतीनंतर त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर होत आहे.
हेही वाचा: Mahim Constituency Politics: सदा सरवणकरांनी घेतला निर्णय; माहीममध्ये तिरंगी लढत अटळ
डॉ. जिशान हुसेन हे काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेसकडून तिकीट मिळण्यासाठी ते इच्छुक होते. पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे हुसेन नाराज होते. ते काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांचं तिकीट नाकारलं. हुसेन यांची उमेदवारी नाकारून साजिद खान पठाण यांना संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या हुसेन यांनी बंडखोरी केली. त्यांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी डॉक्टर हुसेन यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वंचितला या मतदारसंघात उमेदवार राहिला नाही. आता या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठिंबा देते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
त्याचबरोबर लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातही ठाकरे गटातून बंडखोरी करून वंचितकडून तिकीट मिळवलेल संतोष सोमवंशी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मध्यस्थीने संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संतोष सोमवंशी यांनी औसा विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार दिनकर माने यांना जाहीर पाठिंबाही दिला आहे.
हेही वाचा: 5 नोव्हेंबरपासून CAT 2024 चे हॉल तिकीट करता येणार डाउनलोड, जाणून घ्या प्रक्रिया