Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Raj Thackeray : कॉलेज कट्ट्यावरची मैत्री ठरली आयुष्यभराची साथ; राज ठाकरे-शर्मिला ठाकरे यांची क्यूट लव्हस्टोरी

Raj Thackeray Happy Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या आणि शर्मिला ठाकरे यांच्या प्रेमकहाणीची चर्चा पुन्हा रंगली आहे. रुपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर झालेली ओळख पुढे आयुष्यभराच्या नात्यात बदलली. शर्मिला वाघ आणि राज ठाकरे यांची मैत्री प्रेमात बदलली आणि नंतर विवाहबंधनात अडकले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 14, 2026 | 08:49 AM
कॉलेज कट्ट्यावरची मैत्री ठरली आयुष्यभराची साथ; राज ठाकरे-शर्मिला ठाकरे यांची क्यूट लव्हस्टोरी

कॉलेज कट्ट्यावरची मैत्री ठरली आयुष्यभराची साथ; राज ठाकरे-शर्मिला ठाकरे यांची क्यूट लव्हस्टोरी

Follow Us
Follow Us:
  • राज-शर्मिला ठाकरे यांची प्रेमकहाणी चर्चेत
  • ‘तोच माझ्या मागे लागला होता’
  • शर्मिला ठाकरेंचा राज ठाकरेंबाबत मजेशीर खुलासा
Raj Thackeray Sharmila Thackeray Love Story : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे १४ जून २०२४ रोजी आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज ठाकरे यांची आकर्षक शैली आणि मराठी बाणा असणारे राज ठाकरे यांचे प्रेमविवाह झाला होता. त्यांना पाहून त्यांचा विवाह प्रेमविवाह असेल याचा अंदाज लावणे कठीण होते, पण शर्मिला वाघ त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर सर्व काही बदलले. कॉलेजच्या एका कट्ट्यावर झालेली भेट आयुष्यभराच्या नात्यात बदलली. अमित आणि उर्वशीचे आई-बाबापासून ते आता कियानचे आजी-आजोबा होण्यापर्यंत, त्यांचा प्रवास खूप अवर्णनीय राहिला आहे.

राज ठाकरे आणि शर्मिला वाघ यांची भेट कधी आणि कशी झाली, त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर कसे झाले आणि अखेरीस त्यांनी लग्न कसे केले, हे जाणून घेण्यासाठी मनसे समर्थक नेहमीच उत्सुक असतात. युवा पिढीचे आयकॉन असणारे राज ठाकरे यांनी अगदीच तरुण असताना लग्न केले होते. विशेष म्हणजे, शर्मिला ठाकरे त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

पहिली भेट कधी झाली?

राज आणि शर्मिला ठाकरे यांनी एका टीव्ही कार्यक्रमात आपली सुंदर प्रेमकथा सांगितली. शर्मिला यांनी सांगितले की, त्यांची पहिली भेट रूपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर झाली होती आणि त्यांचे नाते इतके खास होईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती.

“राज माझ्या मागे लागला होता.”

शर्मिला ठाकरे यांनी सांगितले की, “रूपारेल कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरी करत होते. रविवारी मी माझ्या मैत्रिणींना भेटायला गेले होते. त्याच वेळी राज त्याच्या मित्रांसोबत तिथे होते. आमचा एक कॉमन मित्र, शिरीष पारकर याने आमची ओळख करून दिली. तेव्हापासून

शर्मिला यांनी गंमतीने पुढे सांगितले की, राज आज कदाचित हे कबूल करणार नाही, पण सुरुवातीपासून तोच माझ्या मागे लागला होता. त्यांनीच लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा राज लँडलाईन फोन करायचा, मग आम्ही तासनतास गप्पा मारायचे. अमितचा जन्म झाला तेव्हा राज फारच लहान दिसत होता असंही त्यांनी गंमतीने पण आवर्जून सांगितलं होतं.

लग्नात अडचण?

राज ठाकरे यांनी हेही सांगितले की, त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे आणि शर्मिलाचे वडील मोहन वाघ हे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळेच त्यांच्या लग्नात कोणतीही अडचण आली नाही. तसेच राज ठाकरे यांची बहीण ही शर्मिलाची खास मैत्रीण होती, मात्र शर्मिलाची राजशी आधीपासूनची ओळख नव्हती ती कॉलेजच्या कट्ट्यावर झाली. इतकंच नव्हे तर शर्मिलाला माहितही नव्हतं की तिच्या मैत्रीणीला इतका हॅंडसम आणि करारी भाऊ सुद्धा आहे.

राज ठाकरे वयाने लहान

शर्मिला ठाकरे या राज ठाकरे यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे लग्नाच्या वेळी विचार करताना त्यांना स्थळ बघण्याची सुरुवात लवकर झाली. शर्मिल या राज ठाकरेंपेक्षा वयाने लहान आहे हे शर्मिला यांच्या वडिलांना माहीतही नव्हते. नंतर, प्रत्येक वाढदिवसाला ते गंमतीने विचारायचे, “तुझं वय काय आहे आणि राजचं वय काय आहे?”

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचा विवाह ११ डिसेंबर १९९० रोजी झाला. त्यांच्या ३६ वर्षांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार आले असले तरी, त्यांचे नाते घट्ट राहिले. मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे, सून मिताली बोरुडे आणि नातू कियान यांच्या आगमनाने त्यांचे कुटुंब आणखी समृद्ध झाले आहे.

Raj Thackeray: “आरोपीला तडफडून मारलं पाहिजे!” नसरापूर घटनेवर राज ठाकरेंचे तळतळाट; समाजाच्या मानसिकतेवर ओढले ताशेरे

Web Title: Raj thackeray sharmila thackeray cute love story college friendship marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • happy Birthday
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
1

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले
2

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

Shweta Tiwari: श्वेता तिवारीला अपशब्द बोलणाऱ्याला मनसेचा दणका; ३ दिवसांत माफीपत्र, अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार
3

Shweta Tiwari: श्वेता तिवारीला अपशब्द बोलणाऱ्याला मनसेचा दणका; ३ दिवसांत माफीपत्र, अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.