Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजाभाऊ राऊतांच्या विजयाने बार्शीत जल्लोषाचा महास्फोट! फटाक्यांची आतषबाजीत भाजप – महायुती कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आलेल्या राजाभाऊ राऊत यांच्या विजयाने बार्शीत आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 09:27 PM
राजाभाऊ राऊतांच्या विजयाने बार्शीत जल्लोषाचा महास्फोट!

राजाभाऊ राऊतांच्या विजयाने बार्शीत जल्लोषाचा महास्फोट!

Follow Us
Follow Us:

बार्शी प्रतिनिधी : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत बार्शीचे नेते राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांचा दणदणीत विजय होताच बार्शी शहरासह तालुक्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होताच भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, गुलालाची उधळण करत आणि नृत्य करत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

मतमोजणीसाठी सकाळपासूनच बार्शीतून हजारो समर्थक सोलापुरात दाखल झाले होते. निकाल जाहीर होताच सोलापूरमध्ये तसेच बार्शीत कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. बार्शीतील सोलापूर रोडवरील बालाजी कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते.

सोलापुरात राजाभाऊ राऊत यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उद्योजक प्रशांत कथले, पंचायत समिती सभापती दीपक रोंगे, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, रावसाहेब मनगिरे, बाजार समितीचे माजी सभापती, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, ज्येष्ठ नगरसेवक विजय राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष असीफभाई तांबोळी यांच्यासह भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, तालुकाध्यक्ष मदन दराडे, भाजयुमो शहराध्यक्ष अमोल डिसले तसेच शहर व ग्रामीण भागातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MLC Election Result 2026 : महाविकास आघाडीला धक्का! सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय

बार्शीतील भोसले चौकातील संपर्क कार्यालयासमोर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील विविध भागांत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुलाल उधळत आणि ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत राजाभाऊ राऊत यांचे बार्शीत आगमन झाले नव्हते. मात्र त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर रोडवर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. राजाभाऊंच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले असून त्यांच्या आगमनानंतर आणखी भव्य जल्लोष होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Solapur MLC Result : सोलापुरात कमळ फुलले! भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मते, देशमुखांचा पराभव

Web Title: Rajabhau raut victory barshi celebration bjp mahayuti workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Solapur

संबंधित बातम्या

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!
1

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!

Solapur News : RTOची खास संधी! ‘MH-13-FF’ मालिकेत मिळवा पसंतीचा फॅन्सी नंबर; १८० दिवसांत वाहन नोंदणी बंधनकारक
2

Solapur News : RTOची खास संधी! ‘MH-13-FF’ मालिकेत मिळवा पसंतीचा फॅन्सी नंबर; १८० दिवसांत वाहन नोंदणी बंधनकारक

Shiv Sena Conflict:  सेनेच्या लढाईवर काय म्हणाल्या ज्योती वाघमारे ? पहा Exclusive मुलाखत
3

Shiv Sena Conflict: सेनेच्या लढाईवर काय म्हणाल्या ज्योती वाघमारे ? पहा Exclusive मुलाखत

Solapur News : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात? माळशिरस तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री, तर शासनाची बंदी कागदावरच?
4

Solapur News : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात? माळशिरस तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री, तर शासनाची बंदी कागदावरच?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.