Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्चपासूनच राजापूरकरांवर पाणी टंचाईचे सावट, धरणातील पाणी पातळी खालावली

सध्या क वर्गात असणाऱ्या राजापूर नगरपरिषदेला पाणी पुरवठ्यावर दरवर्षी ९२ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण पाणी पट्टीच्या करातुन राजापूर नगर परिषदेला केवळ ३० लाख ६१ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 23, 2024 | 02:34 PM
मार्चपासूनच राजापूरकरांवर पाणी टंचाईचे सावट, धरणातील पाणी पातळी खालावली
Follow Us
Close
Follow Us:

गतवर्षी कमी कालावधीत पडलेला पाउस व सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे भुगर्भातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील इंग्रज कालीन साहेबाच्या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. परिणामी राजापूर वासियांवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचे संकट ओढवण्याचे चित्र दिसत आहे.

पावसाळ्यात पाणीच पाणी मात्र उन्हाळ्यात पाणी बाणी अशी राजापूरची दरवर्षी अवस्था असते. राजापूर शहरातून कोदवली व अर्जुना या दोन नद्या वाहत असल्या तरी दरवर्षी राजापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी राजापूर नगरपरिषदेला टंचाई काळामध्ये शीळ जॅकवेलवरुन पाणी पंपाद्वारे खेचावे लागते, त्यातच वीज सातत्याने खंडीत होत असल्याने शीळ जॅकवेलवरुन पाणी खेचण्यात नगर परिषदेलाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी शीळ जॅकवेलवर जनरेटर बसवावा लागतो. या जनरेटरच्या भाड्यापोटी दरवर्षी लाखो रुपयेही खर्च करावे लागतात. मात्र तरीही पाणी टंचाइचे संकट कायम राहते.

सध्या क वर्गात असणाऱ्या राजापूर नगरपरिषदेला पाणी पुरवठ्यावर दरवर्षी ९२ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण पाणी पट्टीच्या करातुन राजापूर नगर परिषदेला केवळ ३० लाख ६१ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे सायबाच्या धरणातील पाणीसाठा संपला कि शहरवासीयांना पाणी पुरवठा करताना राजापूर नगर परिषदेच्या नाकी नउ येतात.

इंग्रजकालीन साहेबाच्या धरणाच्या खालच्या बाजुला राजापूर नगरपरिषदेने आजपर्यंत १० कोटी ७० लाख रुपये खर्च करुन नवीन धरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र निधी कमी पडल्याने सदर नवीन धरण अद्यापही अपुर्ण अवस्थेत आहे. हे नवीन धरण पुर्ण करण्यासाठी अजुन ८ कोटी रुपयांची गरज असल्याचे नगर परिषद प्रशासनाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. या नवीन धरणाचे काम अपुर्ण अवस्थेत असल्याने या धरणात पाणीसाठा होत नसुन सद्यस्थितीत राजापूर नगरपरिषदेला जुन्या इंग्रजकालीन साहेबाच्या धरणावरच पाणी पुरवठ्यासाठी अवलंबुन राहावे लागत आहे. त्यातच आता साहेबाच्या धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत असल्याने यावर्षी राजापूरकराना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Rajapurkar has been facing water shortage since march the water level in the dam has decreased maharashtra goverment ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • Ratnagiri News Update
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून
1

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून

कर्जत तालुक्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘ही’ फाउंडेशन अग्रेसर
2

कर्जत तालुक्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘ही’ फाउंडेशन अग्रेसर

सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा; 291 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
3

सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा; 291 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

उन्हाळा वाढताच टॅंकरमाफियांचा सुळसुळाट! कृत्रिम टंचाई दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश
4

उन्हाळा वाढताच टॅंकरमाफियांचा सुळसुळाट! कृत्रिम टंचाई दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.