Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

भारतीय जनता पक्षाकडून परळी गटातून निवडून आलेले राजू भोसले हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यापूर्वी भोसले हे देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2026 | 08:06 AM
Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : जिल्हा परिषदेच्या निकालानंतर विविध राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गटनेत्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले यांची तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी उदय कबुले यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून परळी गटातून निवडून आलेले राजू भोसले हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यापूर्वी भोसले हे देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले होते. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची भूमिका ते समर्थपणे मांडू शकतील, या भावनेने त्यांच्यावर पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरवळ गटाचे प्रतिनिधित्व करणारे उदय कबुले यांची गटनेतेपदी निवड केली आहे. उदय कबुले यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले असून, ते मंत्री मकरंद पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.

हेदेखील वाचा : Phaltan News : फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरवळ गटातून नितीन भरगुडे-पाटील यांचा पराभव करुन अपक्ष म्हणून उदय कबुले निवडून आले होते. या पंचवार्षिक निवडणुकीतही शिरवळ गटातून नितीन भरगुडे पाटील यांचा पुन्हा एकदा पराभव केला. जिल्हा परिषदेतील त्यांचा राजकीय अनुभव पाहता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांच्या गटनेत्यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेतील सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्या 15 जागा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 15 जागा मिळवल्या आहेत. हेळवाक गटातील अशोक पाटील यांची शिंदेसेनेच्या गटनेते पदी निवड झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनांमध्ये शिवसेना गटाची गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. अशोक पाटील हे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची उठावदार कामगिरी होण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने अभ्यासू आणि तज्ञ गटनेता दिल्याची चर्चा आहे.

Web Title: Raju bhosale is bjp group leader in satara zilla parishad and uday kabule is ncp group leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
1

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन
2

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
3

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara News :  ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर
4

Satara News : ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.