Ramdas Kadam on Anil Parab:
Ramdas Kadam on Anil Parab: शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेला आणखी एक वळण मिळाले आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी (ता. ४) गंभीर आरोप केला की, १९९३ साली माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेची सखोल चौकशी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी करावी, तसेच “१९९३ साली कदम यांच्या घरात नेमके काय घडले होते?” हे उघड करण्यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट घेण्यात यावी, अशी मागणीही अनिल परब यांनी केली होती.
“कदम यांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते की त्यांना जाळण्यात आले होते, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत कदम यांनी केलेला दावा हा धादांत खोटा आहे.” अंसही त्यांनी म्हटलें होतं. अनिल परब यांच्या या आरोपांवर आज रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनीही आपले स्पष्टीकरण दिले, मात्र त्यांनी परब यांच्या सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम म्हणाल्या की, अनिल परब यांनी काल केलेले आरोप खोटे आहेत. काल जे आरोप केले गेले ते चुकीचे आहेत. तेव्हा असं काहीच घडले नव्हते. आम्ही इतके श्रीमंत नव्हतो की आमच्याकडे गॅस सिलेंडर असेल. त्यावेळी मी स्टोव्हवर स्वयंपाक करत असताना माझा पदर स्टोव्हमध्ये अडकला आणि जळू लागला. पण त्यांनी मला वाचवले. मला वाचवताना त्यांचे हात देखील भाजले. मला रूग्णालयात नेण्यात आले आणि नंतर देशाबाहेर उपचारासाठीही नेले गेले. हे आरोप खूप चुकीचे आहेत. आम्हाला बदनाम करू नका, आम्हाला त्रास होतो आहे. मी आज पहिल्यांदा मीडियासमोर आले आहे.”
अनिल परब यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी खेडच्या घरातील आगबाबत माहिती दिली. कदम म्हणाले, “खेडच्या घरात दोन स्टोव्ह होते आणि त्यावर जेवण बनवायचो. जेवण करत असताना माझ्या पत्नीच्या साडीला आग लागली. त्यावेळी मीच पत्नीला वाचवले, पण मला तिची काळजी घेताना हात भाजले. पत्नीला जखमी झाल्यानंतर पुढील सहा महिने तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. मीही तिची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात होतो. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी देखील पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.”
दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral
रामदास कदम यांनी स्पष्ट केले की, “अनिल परब भाXXX आहेत. मातोश्रीमध्ये डॉक्टरांची टीम होती, ही माहिती खोटी आहे. अनिल परब फक्त उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी खोटे बोलले आहेत. मी आधीच लोकांच्या समोर जाहीर केले होते की बाळासाहेब खेडला गेले होते. जर डॉक्टरांची टीम खरी होती, तर त्यांची नावे सांगा,” असे त्यांनी सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला, “तर अनिल परब तू का बोलतो? उद्धव ठाकरे का बोलत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.