दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. लोक कधीही कुठेही भांडायला सुरुवात करतात. दिल्ली मेट्रोतील भांडणाचे तर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी महिलांच्या सीटवरुन भांडणाचे, तर कधी धक्का बुक्कीवरुन भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. आता यामध्ये पुरुष देखील मागे राहिलेले नाहीत. सध्या सोशल मीडियावर पुरुषांमधील भांडणाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु होता. पण वाद इतका वाढला की त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केला आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही प्रवासी एकमेकांना लाथा मारत आहे. एकाने दुसऱ्याला जमिनीवर पाडले आहे. इतर प्रवासी त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दोघांपैकी कोणीही ऐकायला तयार नाही. दोघांची दे दणादण सुरुच आहे. एकमेकांच्या अंगावर धावून जात आहे. भांडणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral
Delhi Metro mein aapka swagat hai pic.twitter.com/tvAY1Dz5nI — Amitabh Chaudhary (@MithilaWaala) October 5, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MithilaWaala या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांनी हे रोजचे झाले असल्याचे म्हटले आहे. लोकांना आता घरात टिव्ही बघण्यापेक्षा मेट्रोत मनोरंजन मिळत आहे. यापूर्वी देखील असे अनेक भांडणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दिल्ली मेट्रो केवळ भांडणाच्या व्हिडिओवरुनच नव्हे, तर कपल रोमान्, अश्लील चाळे या कारणांवरुनही सतत चर्चेचा विषय बनत असते. गेल्या काही दिवसांपूर्वीच एक आजोबा मेट्रोतच लघुशंका करत होते. या घटनेचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता. तर यापूर्वी दोन महिलांमध्ये सीटवरुन राडा झाला होता.
निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.