Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

आज राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान या निवडणुकीचा निकाल 9 तारखेला सोमवारी लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 04:14 PM
Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

आज राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान 
रत्नागिरी जिल्ह्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड 
रामदास कदम यांनी दिली प्रतिक्रिया

ZP Election 2026: आज राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान या निवडणुकीचा निकाल 9 तारखेला सोमवारी लागणार आहे. दरम्यान आज मतदान सुरू असताना अनेक ठिकामी मतदान यंत्र बंद पडणे किंवा त्यात बिघाड होणे असे प्रकार घडले. यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाष्य केले आहे.

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम म्हणाले, “ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मतदार करत असलेल्या मताची किंमत ही अनमोल, अमूल्य अशी आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी लेखता येणार नाही. मशीनमध्ये बिघाडाची मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.”

पुढे बोलताम मंत्री रामदास कदम म्हणाले, “या प्रकरणी मी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे. शासन, निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. गरज पडल्यास बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, मला त्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनातील संशय दूर होईल.”

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आज महाराष्ट्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वावंजा पंचायत समितीसाठी वावंजा गावात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, विशेषतः महिलांचा प्रतिसाद सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजा गावात तळ ठोकत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. तर शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील हेही सकाळपासून गावात फिरून मतदारांशी संवाद साधत आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी

सकाळच्या सत्रात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत एकूण १८,०३७ मतदारांनी मतदान केले. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात मतदानाचा वेग तुलनेने मंद होता; मात्र ९ नंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

Web Title: Shivsena leader ramdas kadam statement about chiplun khed evm machine maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • EVM
  • Maharashtra Politics
  • Ramdas Kadam
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रात दहावीचा निकाल जाहीर! मुलींनी पुन्हा मारली बाजी
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रात दहावीचा निकाल जाहीर! मुलींनी पुन्हा मारली बाजी

Maharashtra Politics : मंत्रिमंडळातून वगळलेले सावंत, केसरकर अद्याप ‘नॉट रिचेबल’; पण सत्तारांनी घेतली ‘या’ मंत्र्याची भेट
2

Maharashtra Politics : मंत्रिमंडळातून वगळलेले सावंत, केसरकर अद्याप ‘नॉट रिचेबल’; पण सत्तारांनी घेतली ‘या’ मंत्र्याची भेट

Maharashtra Politics : पाच राज्यांतील निकालानंतर महायुतीत खळबळ; अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार ‘डच्चू’?
3

Maharashtra Politics : पाच राज्यांतील निकालानंतर महायुतीत खळबळ; अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार ‘डच्चू’?

Dr. Neelam Gorhe News:  डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू बिनविरोध; विधानभवन येथे अधिकृत घोषणा
4

Dr. Neelam Gorhe News: डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू बिनविरोध; विधानभवन येथे अधिकृत घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.