मुंबई: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही (Mission Baramati) घोषणा केली. यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) एकत्र लढणार असल्याचं देखील जाहीर करतानाच या युतीच्या माध्यमातून विधानसभेत २००हून जास्त तर लोकसभेत राज्यातून ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना बावनकुळेंनी बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
[read_also content=”‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात यतीन कार्येकर साकारणार औरंगजेबाची भूमिका https://www.navarashtra.com/movies/actor-yatin-karyekar-to-play-a-role-of-aurangjeb-in-shivpratap-garudjhep-nrsr-322913.html”]
महेेश तपासे म्हणाले की, संसदरत्न सुप्रिया सुळे यांचा लोकसभा मतदारसंघ बारामती आम्ही काबीज करु, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज म्हटलं आहे, पण सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ राजकारणाने नाही तर समाजकारणाने बांधलेला आहे. भाजपा सगळ्या गोष्टीचं राजकारण करत असते. भाजपाचं बारामती काबीज करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. बावनकुळे हे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी बातमी व्हावी म्हणून हे वक्तव्य केलं आहे. बावनकुळे हे विसरले आहेत की भाजपकडून सुळेंच्या कामाची प्रशंसा झाली आहे. भाजपाच्या काळातही त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.