Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

भाजपाला बारामतीत पराभवाला सामोरे जावे लागले असून, या राष्ट्रीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 12:45 PM
केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Follow Us
Follow Us:

सोमेश्वरनगर/ हेमंत गडकरी : पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी पक्षातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्यांना आपल्या पक्षात घेऊन क्लिनचीट देऊन सन्मानाची पदे देणाऱ्या भाजपाला बारामतीत पराभवाला सामोरे जावे लागले असून, या राष्ट्रीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या निकालाने भाजपची बारामतीतील दयनीय स्थिती समोर आली असून, केंद्रात व राज्यात हिरो असलेल्या भाजपला बारामतीच्या मतदारांनी झिरो केल्याचे चित्र आहे.

 

केंद्रातील सर्वोच्च नेत्यांपासून राज्यातील अनेक नेत्यांना बारामतीत मोठा इंटरेस्ट आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांच्याकडे बारामतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनीही बारामतीत भेटी देत भाजपला स्पेस शोधण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील सर्वच बडे भाजप नेते बारामतीत येऊन पवारांना आव्हान देण्याची भाषा करायचे. स्थानिक नेत्यांना मोठी रसद पुरवण्याचे काम राज्यातील बड्या भाजप नेत्यांनी केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांना भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष तर जिरायत भागातील भाजप नेते दिलीप खैरे यांना पुणे जिल्हा बाजार समितीचे प्रशासक पद देऊन ताकत देण्याचा प्रयत्न झाला परंतु भाजपला बारामतीत प्रवेश मिळाला नाही. विधानसभा निवडणुकीतही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त केले होते. त्यामुळे भाजप नेहमीच बारामतीत शिरकाव करण्याची संधी शोधत असते.

भाजपसाठी दोन हक्काच्या जागा दिल्या

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांनी केंद्रात व राज्यात सोबत काम करतोय असे सांगत मनाचा मोठेपणा दाखवत भाजपसाठी पंचायत समितीच्या दोन हक्काच्या जागा दिल्या. मात्र या दोन्ही जागा घेऊनही भाजपने जिल्हा परिषदेच्या चार जागांवर तर पंचायत समितीच्या सहा जागांवर आपले अधिकृत उमेदवार उभे करत अजितदादांना धोका दिला. बारामतीत भाजप -राष्ट्रवादी युती नाही असे पत्रही भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी प्रसिद्ध केले होते. दुसरीकडे दादांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीने एकाही मतदारसंघात प्रचार केला नाही, जाहीर सभा घेतल्या नाहीत. दादांनी दिलेला शब्द म्हणून भाजपच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागा निवडून दिल्या. मात्र इतर सर्व ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग

राष्ट्रवादीचे भरघोस मतांनी विजयी झालेले उमेदवार

सुपे कऱ्हाटी गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार पल्लवी प्रमोद खेत्रे यांनी १८०९४ मते घेतली तर भाजपच्या उमेदवार वंदना विशाल कोकरे यांना केवळ २६७७ मते मिळाली. वडगाव निंबाळकर – मोरगाव गटात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहिणी संदीप कदम ढोले यांनी २२५७२ मते घेत विक्रम प्रस्थापित केला तर भाजपच्या आरती मधुकर लोखंडे यांना फक्त १०३६ मते मिळाली. पणदरे – मुढाळे गटात राष्ट्रवादीचे उमेदवार मंगेश प्रतापराव जगताप यांना २०८०० मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सुरेश अरविंद जगताप यांना ३२६४ मतांवर समाधान मानावे लागले. निंबूत – कांबळेश्वर गटात राष्ट्रवादीचे युवा उमेदवार करण खलाटे यांना २२१८१ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार दिग्विजय वसंतराव काकडे यांना अवघी २६५७ मते मिळाली. या चारही गटातील भाजपच्या उमेदवारांच्या एकूण मतांची बेरीज फक्त ९६३४ इतकी होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी तब्बल ८३६४७ मते घेत विक्रम प्रस्थापित केला आहे.

Web Title: Bjp has been defeated in baramati in the zilla parishad and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • BJP
  • Election News

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल
4

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.