Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार; कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 01:48 PM
अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार; कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार; कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार
  • कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी
  • युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-३) अंतर्गत अतिरिक्त इमारत बांधकामे व विविध आधुनिक क्रीडा सुविधा उभारणीसाठी ७५.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मार्गी लावून घेत दिवंगत अजित पवारांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेल्या बारामती तालुक्यातील कटफळ येथील ८० हजार चौ.मी. क्षेत्रावर हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जाणार असून, यामुळे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंक, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान यासह विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार जिल्हा पातळीवर क्रीडा संकुल उभारणीचा संकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पुढे नेला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बारामती येथे टप्पा-१ व टप्पा-२ अंतर्गत क्रीडा सुविधा उभारल्या गेल्या असून, आता टप्पा-३ मुळे या संकुलाचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे.

हे सुद्धा वाचा : कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव

प्रकल्पामुळे युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार

उच्चस्तरीय सचिव समितीने प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, आधुनिक वास्तुशास्त्रीय मानकांनुसार संकुलाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार असून, क्रीडा क्षेत्रात बारामती तालुका राज्यात नवे आदर्श प्रस्थापित करेल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील क्रीडा संकुल प्रत्यक्षात साकार होत असून, त्यांच्या दूरदृष्टीला हीच खरी आदरांजली ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Web Title: The cabinet has approved the district sports complex at katphal in baramati taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात
1

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
2

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.