Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेशनकार्डधारकांनो, ई-केवायसी करून घ्या; अन्यथा रेशन होईल बंद

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. ज्यामध्ये बहुतांश गरीब आणि गरजू लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन मिळते. दरम्यान, आता केंद्र सरकारने कार्डधारकांसाठी नवा नियम लागू केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 19, 2024 | 01:35 PM
तुम्ही अद्याप ई-केवायसी केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

तुम्ही अद्याप ई-केवायसी केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर : नागरिकांना कमी दरात धान्य मिळावे, यासाठी शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दर महिन्याला शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करते. मात्र, आता 1 नोव्हेंबरपासून केवायसी न करणाऱ्या नागरिकांचे रेशन बंद होऊ शकते. त्यामुळे कार्डधारकांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा : पुण्यात ससून रुग्णालयामध्ये काळीमा फासणारा नवा कारनामा; संबंधित दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. ज्यामध्ये बहुतांश गरीब आणि गरजू लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन मिळते. दरम्यान, आता केंद्र सरकारने कार्डधारकांसाठी नवा नियम लागू केला आहे. रेशनकार्डचे केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबरपासून रेशन बंद केले जाईल.

कमी दराच्या शिधावाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. आता सरकारने कार्डधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने आधीच प्रसिद्ध केली आहे. मात्र, मृतांची नावे काढली जातील.

रेशनकार्डवर मरण पावलेल्या अनेकांची नावे आहेत. त्यामुळे त्यांची नावे काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्व शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ज्यांची नावे शिधापत्रिकेत आहेत, त्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जवळच्या रेशन वितरण विभागाच्या कार्यालयात जाऊ शकता. कोणत्याही सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल.

हेदेखील वाचा : भाजपच्या गडाला सुरूंग लागणार; अश्विनी जगताप शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

आजही अनेक शिधापत्रिकाधारक आहेत, ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सर्व कार्डधारकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना रेशन मिळणे बंद होईल. अशा लोकांची नावेही शिधापत्रिकांवरून काढून टाकली जातील आणि ज्यांनी ई-केवायसी केले नसेल, त्यांची शिधापत्रिका रद्द केली जातील. यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही.

Web Title: Ration card holders do e kyc asap otherwise the ration will be closed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 01:35 PM

Topics:  

  • Ration card News

संबंधित बातम्या

Ration Card Online Process: आता घरबसल्या रेशन कार्डसाठी करा अप्लाय! रांगेत उभं राहण्याची गरज नाही, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस
1

Ration Card Online Process: आता घरबसल्या रेशन कार्डसाठी करा अप्लाय! रांगेत उभं राहण्याची गरज नाही, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

तुम्ही अद्याप e-KYC केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशनकार्ड होणार बंद
2

तुम्ही अद्याप e-KYC केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशनकार्ड होणार बंद

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची अपडेट! ३० जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचे रेशन होऊ शकते बंद
3

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची अपडेट! ३० जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचे रेशन होऊ शकते बंद

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यातील १८ लाख शिधापत्रिका रद्द, नेमकं कारण काय?
4

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यातील १८ लाख शिधापत्रिका रद्द, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.