Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 23, 2025 | 07:23 PM
Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Follow Us
Close
Follow Us:
  • वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच
  • औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • कंपव्यांवर गावकऱ्यांची नाराजी
खेड : कधी तलावात तर कधी नदीमध्ये अचानकपणे माशांचा मृत्यू होतो. दिवसेंदिवस हे प्रमाण अधिकच वाढत जाताना दिसत आहे याचं कारण म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा निष्काळजीपणा. अशीच एक निष्काळजीपणाची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राची शुद्ध पाणी वाहून नेणारी जलवाहिनी कोतवली गावाजवळ फुटल्याने वाशिष्ठी नदीपात्रातील मासे मृत अवस्थेत आढळल्याची घटना दीपावलीच्या सणाच्या काळात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील मच्छिमारांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कायमचा बंदोबस्त करा नाहीतर तीव्र आंदोलन करू! रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला इशारा

औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून येणारे दूषित पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर नदीत सोडले जाते. मात्र, दीपावलीच्या सुट्टीचा गैरफायदा घेत काही कारखान्यांकडून अप्रक्रियायुक्त दुषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते, असा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या पाण्यामुळे कोतवली गावाजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत पावले असून पर्यावरणीय संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून “दूषित पाणी वाहून नेणारी जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करावी आणि मच्छिमारांच्या नुकसानीचा पंचनामा करावा” अशी मागणी केली. तसेच पंचनामा होईपर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती होऊ देणार नाही, असा इशाराही दिला.

या घटनेनंतर एमआयडीसीचे ठेकेदार, डेप्युटी इंजिनिअर आर. जी. कुळकर्णी यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर 2025 रोजी कोतवली ग्रामपंचायत कार्यालयात एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलशुद्धीकरण केंद्राचे अधिकारी सहभागी होणार आहेत.या घटनेला जबाबदार कोण आणि वाशिष्ठी नदीत पुन्हा दुषित पाणी कसे पोहोचले, याची बैठकीत सखोल चौकशी केली जाणार असून पंचनामा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक

 

 

 

Web Title: Ratnagiri news dead fish waste in vashishthi riverbed pollution issue back on the agenda due to burst water pipeline in industrial area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 07:23 PM

Topics:  

  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार
1

Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली
2

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

‘देव तारी त्याला कोण मारी’, अपघातात 37 प्रवासी जखमी, मात्र 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला, आंबा घाट वळणावरील घटना
3

‘देव तारी त्याला कोण मारी’, अपघातात 37 प्रवासी जखमी, मात्र 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला, आंबा घाट वळणावरील घटना

रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान
4

रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.