Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजापूरात गोवा बनावटीच्या दारुचा महापूर , राजापूर पोलीस अधिकाऱ्यांची माहिती

जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात धडक कारवाई त्याचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 11, 2023 | 06:28 PM
राजापूरात गोवा बनावटीच्या दारुचा महापूर , राजापूर पोलीस अधिकाऱ्यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

राजापूर : ऐन दिवाळीत फटाके फुटत असतानाच राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे राजरोसपणे फटाके फुटत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. गोवा बनावटीच्या विदेशी दारूची शहरासह तालुक्यात खुलेआमपणे लगतच्या गोवा राज्यातून वाहतूक व विक्री होत असून या एकूणच प्रकाराबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील या बनावटीच्या विदेशी दारूची राजरोजसपणे सुरू असलेल्या वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा की काय? असा सवाल केला जात आहे.

गत महिन्यात अशाच प्रकारे संरक्षण देऊन गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक रोखल्याप्रकरणी पोलीसांवर गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर पोलीसांनी काहींना अटक करून कारवाई केली होती. मात्र यातील मुख्य आरोपीपर्यंत पोलीस अद्यापही पोहचलेले नाहीत. या प्रकरणाचे पुढे काय झाले याबद्दलही पोलीसांनी कोणतीच माहिती उघड केलेली नाही. तर याचवेळी नाटे येथे पोलीसांनी अशाच प्रकारे एका बारच्या व्हरांडयात गोवा बनाटीच्या विदेशी दारूचे उतरलेले सुमारे अडीच लाखाचे बॉक्स जप्त केले होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग असो व पोलीस प्रशासन असो त्यांच्या या कारवाया म्हणजे केवळ दिखाऊपणा असल्याचे बोलले जात आहे.

राजापूर तालुक्यातही खास करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक व विक्री होत आहे. गोवा व सिंधुदुर्गातून तालुक्यात रात्री-अपरात्री या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे कंटेनर, टेम्पो येत असून तालुक्यात अनेक ठिकाणी ही दारू उतरवली जात आहे. यामध्ये नाटे, जैतापूर, सागवे, केळवली रेल्वेस्टेशन परिसर, पाचल, तळवडे, सौंदळ अशा भागात या दारूची वाहतूक व विक्री होत आहेत. यातील काही जण तर गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे होलसेलचे विक्रेते असून ते लगतच्या भागातील छोट्या छोट्या गावात ही दारू पोहचवत आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ही गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री होत असून राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन मात्र अनभिज्ञच आहे. त्यामुळे कायद्याचा धाक वगैरे बाबी क्षुल्लक ठरल्या आहेत.

या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची राजरोसपणे विक्री होत असल्याने व कमी पैशात ही दारू मिळत असल्याने तरूण पिढीही या व्यसनात ओढली जात असून अनेक कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात धडक कारवाई त्याचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता पोलीस अधिक्षकांनी राजापूर तालुक्यातील गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या राजरोसपणे सुरू असलेल्या विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनालाही जागे करावे अशी मागणी राजापूर वासियांतून होत आहे.

Web Title: Ratnagiri rajapur maharashtra crime case maharashtra government exotic liquor made in goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2023 | 06:28 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Ratnagiri Crime Case

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.