Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताच्या अंतिम अहवालाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. घातपाताचा संशय व्यक्त करणारे तक्रारदार हेमंत पाटील यांनी AAIB महासंचालकांची भेट घेतली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार एका महिन्यात अहवाल देण्याचे आश्वासन मिळाले आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 21, 2026 | 08:58 PM
Ajit Pawar Plane Crash

Ajit Pawar Plane Crash

Follow Us
Follow Us:
  • हेमंत पाटील यांनी AAIB च्या DG यांची भेट घेतल्याचा दावा केला.
  • तपास एका महिन्यात पूर्ण करून अहवाल देण्याचे आश्वासन
  • AAIB ने बारामती विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आधीच केला जारी
 

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार यांच्या बारामती विमान अपघाताच्या तपासासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल करणारे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज Aircraft Accident Investigation Bureau अर्थात AAIB च्या महासंचालकांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे.

या भेटीनंतर हेमंत पाटील यांनी, त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास पूर्ण करून एका महिन्यात अहवाल जारी करण्याचे आश्वासन AAIB कडून मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या अंतिम तपास अहवालात काय निष्कर्ष समोर येतात, याकडे लक्ष लागलं आहे.

‘अजित पवारांचा अपघात की घातपात?’ तक्रार नेमकी काय?

हेमंत पाटील यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांनी बारामतीमध्ये तक्रार केली. त्यावर दखल घेतली गेली नसल्याचा दावा करत त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात नेल्याचेही त्यांनी सांगितले.

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

हेमंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास AAIB करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी जून महिन्यात AAIB कडे स्वतंत्रपणे तक्रार केली. मात्र, त्यावर उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी आता AAIB च्या DG यांची भेट घेतल्याचे सांगितले.

‘एका महिन्यात अहवाल नाही आला तर पुन्हा कोर्टात जाणार’

AAIB अधिकाऱ्यांनी तपास एका महिन्यात पूर्ण करून अजित पवार विमान अपघाताचा अहवाल जारी करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा हेमंत पाटील यांनी केला आहे.

“एका महिन्यात अहवाल नाही मिळाला तर पुन्हा उच्च न्यायालयात जाणार,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, AAIB ने 28 फेब्रुवारी 2026 रोजी बारामतीतील Learjet अपघाताचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. या प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता, विमानतळावरील काही सुरक्षा-सुविधांशी संबंधित त्रुटी आणि ऑपरेशनल बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असल्याचे समोर आले होते. AAIB ने पुढील तपासातून अपघाताची तथ्ये, मूळ कारणे आणि संबंधित घटक निश्चित करण्याचे सांगितले होते.

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

अंतिम अहवालात काय समोर येणार?

अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर उतरत असताना Learjet विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.

AAIB च्या प्राथमिक अहवालात अपघाताच्या वेळी दृश्यमानता 3 किलोमीटर असल्याचे नमूद करण्यात आले होते, तर संबंधित VFR ऑपरेशनसाठी 5 किलोमीटर दृश्यमानतेची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद आहे.

आता हेमंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार एका महिन्यात तपासाचा अहवाल येतो का आणि त्यात नेमके कोणते निष्कर्ष नोंदवले जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Ajit pawar airplane crash final report aaib hemant patil complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
1

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
2

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
3

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
4

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.