Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची घोषणा केली. दुष्काळ संहितेच्या ट्रिगर-1 अंतर्गत मदतीचा आदेश उद्याच काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 07:47 PM
Devendra Fadnavis meet Farmers

Devendra Fadnavis meet Farmers

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळ संहितेच्या ट्रिगर-1 अंतर्गत मदतीचा आदेश उद्याच काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
  • केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीची मदत देणार.
  • चाराटंचाई, पाणीटंचाई, रब्बी पिकं, विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि रोजगारासाठीही उपाययोजना
 

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ संहितेच्या ट्रिगर-1 अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांना दुष्काळाची झळ पोहोचली असून पिकं संकटात आली आहेत. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाशिममधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर अमरावती विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही’

शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहिली जाणार नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यात येईल. त्याचवेळी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी आवश्यक पंचनामे आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पाठवला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

सर्वदूर पिकांची परिस्थिती जवळपास सारखीच असल्याने राज्य सरकारने मदतीचं धोरण आखलं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलं जाणार आहे.

चाराटंचाई, पाणीटंचाईपासून रब्बी पिकांपर्यंत उपाययोजना

दुष्काळामुळे पुढील काळात चाराटंचाई आणि पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही समस्यांवर उपाययोजना करण्यासोबतच गरज पडल्यास अन्नधान्याचीही मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी थेट मदत करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

रब्बी हंगामात ज्या भागात उपलब्ध पाण्यावर पिकं घेता येतील, त्या ठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. रोजगारासाठी जलसंधारणाच्या कामांवरही भर देण्यात येणार आहे. आटलेल्या जलसाठ्यांमधील गाळ काढणे, जलसाठ्यांशी संबंधित संरचनांची दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी नवीन कामं करण्याचं नियोजन केलं जाणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफी केली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार नवीन कर्ज देणं बँकांना बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच शेतमालाची शासकीय दराने खरेदी करण्यासाठी लवकरच नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Web Title: Maharashtra drought relief order tomorrow cm devendra fadnavis farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • drought news
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार
1

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
3

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा
4

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.