Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूरसंरक्षणासाठी २२०० कोटींचा पूर्वप्राथमिक आराखड्याला मिळणार मंजुरी, अजित पवारांचे आश्वासन

पूरस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी रत्नागिरी आणि चिपळूण शहरात पूरसंरक्षणासाठी २२०० कोटींचा पूर्वप्राथमिक आराखड्याला मिळणार मंजुरी देण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 09, 2025 | 04:49 PM
पूरसंरक्षणासाठी २२०० कोटींचा पूर्वप्राथमिक आराखड्याला मिळणार मंजुरी, अजित पवारांचे आश्वासन

पूरसंरक्षणासाठी २२०० कोटींचा पूर्वप्राथमिक आराखड्याला मिळणार मंजुरी, अजित पवारांचे आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण (प्रतिनिधी):– दर पावसाळ्यात वशिष्ठी आणि तिच्या उपनद्या पात्र सोडून ओसंडून वाहू लागतात. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने नद्यांच पाणी बाजारपेठात आणि लोकवस्तीत शिरायला सुरुवात होते. दरवर्षी गावकरी या त्रासातून जात असताता. या समस्येवर योग्य तो निर्णय घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूणकरांना आश्वासन दिलं आहे.

चिपळूण शहर व परिसरातील वाशिष्ठी नदी व उपनदीवरील पूर संरक्षक कामांसाठी २,२०० कोटींचा पूर्व प्राथमिक बृहत आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला आहे. या आराखडा मान्यतेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी या आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री पवार यांनी आमदार निकम यांना दिले आहे.गेल्या ५ वर्षात चिपळूण शहर विकासासाठी आमदार निकम यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पूर नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी २१ कोटीच्या नलावडा बंधाऱ्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे, तर २९० कोटीच्या संरक्षक भिंतीच्या प्रस्तावाबरोबरच पूर नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २,२०० कोटींचा पूर्व प्राथमिक आराखडाही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात आमदार निकम यांनी मंगळवारी अर्थमंत्री पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

शहरातील वाशिष्ठी नदीत जुलै २०२१ आलेल्या महापूर परिस्थितीमध्ये शहरामध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली होती.त्यानंतर २०२१मध्ये वाशिष्ठीतील गाळ उपसा व बेटं काढण्यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध झाला. शहर व परिसरातील पुराची दाहकता कमी करण्याच्यादृष्टीने कोल्हापूर व सांगली येथील शहरांच्या पूर प्रतिबंधक उपाययोजनेसाठी आराखडा शासनाने मंजूर केला. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने २२०० कोटी किंमतीचा चिपळूण शहराचा व परिसराचा बृहत आराखडा तयार केला आहे व त्यास मान्यता मिळावी, अशी मागणी आमदार निकम यांनी केली. त्याचबरोबर शहरामध्ये नदी काठावर काही ठिकाणी सखल भाग असल्यामुळे पूर कालावधीमध्ये पाणी नागरी वस्तीमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात घरांना धोका निर्माण होवून वित्तहानी होत आहे. त्यामुळे शहरामध्ये नगर परिषद हद्दीतील एकूण ११ व ग्रामपंचायत हद्दीमधील एकूण १४ ठिकाणी पूर संरक्षक, धूपप्रतिबंधक भिंती बांधण्याचा एकत्रित २९० कोटीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला आहे. या ठिकाणी पूर संरक्षक, धूपप्रतिबंधक मातीचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे असून या कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी योग्य ते आदेश व्हावेत, अशी विनंती केली आहे.

दरम्यान, शासन स्तरावरून प्राप्त झालेल्या निधीतून २०२१ ते २०२४ या कालावधीत सुमारे २० लक्ष घ मी इतका गाळ वाशिष्ठी व उपनदीमधून काढण्यात आला आहे. शहर व परिसरामधील निळी व लाल पूररेषेचे सिमांकन वाशिष्ठी व उपनदी पात्रामधील गाळ काढण्यापूर्वी करण्यात आले आहे. या जुन्या पूररेषेमुळे शहर व मुख्य बाजारपेठेचा विकास खुंटला असून शहर विकासाची कामे करताना चिपळूणमधील नागरिकांना अनेक समस्या निर्माण होत आहे. तसेच वाशिष्ठी व उपनदीमधील गाळ काढल्यामुळे नदीपात्राची पूर वाहून नेण्याच्या क्षमतेत व भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिपळूण शहर व परिसरमध्ये विकासास चालना देण्यासाठी निळ्या व लाल पूररेषेचे फेरसर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचेही निदर्शनात आणून दिले आहे. दरम्यान, चिपळूण शहर पूरनियंत्रणाच्या दृष्टीने सादर करण्यात आलेले प्रस्ताव आणि तयार करण्यात आलेला आराखडा यावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मंत्री पवार यांनी आमदार निकम यांना दिले.

Web Title: 2200 crore preliminary plan will be approved for flood protection ajit pawars assurance in chiplun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
3

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.