
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना- भाजप युती झाली. या युतीच्या जागा वाटपात शिवसेनेने 16 जागा तर भाजपने 11 जागा पदरात पाडून घेतल्या. तर नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेला देण्यात आली. भाजपकडून रुपाली दांडेकर, मकरंद खातू, रुही खेडेकर, वैशाली निमकर, संदीप भिसे, शशिकांत मोदी, अंजली कदम, रसिका देवळेकर, सारिका भावे, शुभम पिसे, शीतल रानडे या 11 जणांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये शशिकांत मोदी, आशिष खातू, सौ. रसिका देवळेकर या तीन अनुभवी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या 11 उमेदवारांनी विरोधी उमेदवारांना चांगलीच लढत दिली. यामुळे भाजपचे 7 नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये रुपाली दांडेकर, वैशाली निमकर, संदीप भिसे, अंजली कदम, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, शुभम पिसे यांचा समावेश आहे.
विशेषतः भाजपा युवा मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष शुभम पिसे यांचा विजय लक्षवेधी ठरला आहे. शुभम पिसे यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवताना दिग्गज उमेदवार माजी नगरसेवक निशिकांत भोजने, मोहन मिरगल, सुधीर शिंदे या तिघांना पराभवाची धूळ चाखत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. या प्रभागात पंचरंगी लढत झाली. यामध्ये नित्यानंद भागवत हे देखील उमेदवार होते. या निवडणुकीत शुभम पिसे व माजी नगरसेवक मोहन मिरगल यांच्यात खरी लढत झाली. यामध्ये पिसे यांना 661तर मिरगल यांना 466 मते मिळाली. ही आकडेवारी पाहता पिसे यांनी मिरगल यांचा 195 मतांनी पराभव करीत विजयाची मोहोर उमटवली आहे. एकंदरीत शुभम पिसे भाजपकडून ‘जायंट किलर’ ठरले आहेत.
या प्रभागातून निवडणूक लढवलेले मोहन मिरगल, सुधीर शिंदे, निशिकांत भोजने यांना निवडणूक लढविण्याचा अनुभव होता. तर शुभम पिसे हे नवखे उमेदवार होते. तरीही भाजपचे नेते तथा चिपळूण नगर परिषद निवडणूक संयोजक प्रशांत यादव यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे चांगलेच पाठबळ मिळाले तर मतदारांनी देखील जुन्यांना घरचा रस्ता दाखवत नवखा चेहरा असलेले शुभम पिसे यांना चिपळूण नगरपरिषदेवर बहुमताने निवडून दिले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे नगरसेवक शुभम पिसे यांनी प्रभागातील मतदाराने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. भाजपच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युतीचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या सहकार्याने प्रभागातील प्रलंबित विकास कामे प्रभागवासीयांना विश्वासात घेऊन मार्गी लावण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न करू. यातून प्रभाग ‘विकासात्मक मॉडेल’ ठरवू, अशी ग्वाही दिली आहे.
Ans: चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपने दोन जागांची वाढ करत एकूण 7 जागांवर विजय मिळवला असून शहरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
Ans: या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली होती. युतीअंतर्गत शिवसेनेला 16 जागा तर भाजपला 11 जागा देण्यात आल्या होत्या. नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेला देण्यात आली होती.
Ans: भाजपने दिलेल्या 11 उमेदवारांपैकी 7 उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये रुपाली दांडेकर, वैशाली निमकर, संदीप भिसे, अंजली कदम, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर आणि शुभम पिसे यांचा समावेश आहे.