चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025 News in Marathi : नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या अटीतटीच्या मतदानानंतर आज सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. याचदरम्यान दुपारनंतर निवडणुकीचे निकाल स्पष्ट होऊ लागले होते. या निवडणुकीत चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्षपदी उमेश धोंडीराम सकपाळ यांनी दणदणीत विजय मिळवत चिपळूणच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. विविध प्रभागांतून विजयी झालेल्या उमेदवारांमुळे नगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
नगराध्यक्ष – उमेश धोंडीराम सकपाळ. प्रभाग क्रमांक १ जागा अ – नाखुदा मिसबा अजगर, जागा ब – जुळे उदय विठ्ठल. प्रभाग क्रमांक २ जागा अ – सौ. सफा दिलबर गोटे, जागा ब – सरगुरोह साजिद हनीफ खान. प्रभाग क्रमांक ३ जागा अ – दांडेकर रूपाली राकेश, जागा ब – बुरटे प्रमोद सुभाष. प्रभाग क्रमांक ४ जागा अ – अजय पांडुरंग भालेकर, जागा ब – वैशाली विलास कदम. प्रभाग क्रमांक ५ जागा अ – कोवळे निहार हेमंत, जागा ब – नसरीन खडस. प्रभाग क्रमांक ६ जागा अ – निमकर वैशाली मधुकर, जागा ब – गोताड संजय चंद्रकांत. प्रभाग क्रमांक ७ जागा अ – भिसे संदीप अशोक, जागा ब – हर्षली संदेश पवार. प्रभाग क्रमांक ८ जागा अ – वांगडे साईनाथ नजीर, जागा ब – योगेश जगन्नाथ पवार. प्रभाग क्रमांक ९ जागा अ – अंजली सतीश कदम, जागा ब – मोदी शशिकांत श्रीकांत. प्रभाग क्रमांक १० जागा अ – देवळेकर रसिका रत्नदीप, जागा ब – विक्रांत उर्फ कपिल विठ्ठल शिर्के. प्रभाग क्रमांक ११ जागा अ – नीलम सीताराम जाधव, जागा ब – अंकुश आवले. प्रभाग क्रमांक १२ जागा अ – उमा उदय देसाई, जागा ब – पिसे शुभम दयानंद. प्रभाग क्रमांक १३ जागा अ – गणेश आग्रे, जागा ब – महाडिक पल्लवी मोहन. प्रभाग क्रमांक १४ जागा अ – शिंदे कांचन सुमित, जागा ब – मिथिलेश विकी नरळकर. निकाल जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण असून, विकासाभिमुख व पारदर्शक प्रशासनाच्या अपेक्षा नागरिकांनी नव्या नगरपरिषदेकडून व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना शिंदे गट : ९
भाजप : ७
शिवसेना ठाकरे गट : ५
काँग्रेस : ३
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : २
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : २
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात होते. तर नगरसेवकपदासाठीच्या २८ जागांसाठी तब्बल ११० उमेदवार रिंगणात होते. चिपळूणची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.






