Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

इचलकरंजीतील महायुतीतील बहुतांश नगरसेवक व नगरसेविका थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबा येथे दोन दिवसांच्या सहलीसाठी रवाना झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 04:40 PM
इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

Follow Us
Follow Us:
  • इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर
  • दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार
  • महापौर निवडीवेळी सभागृहात उपस्थित राहणार
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असताना, महायुतीकडून महापौरपदासाठी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या दोघांनी शनिवारी आपले अर्ज दाखल केल्यानंतर, महायुतीतील बहुतांश नगरसेवक व नगरसेविका थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबा येथे दोन दिवसांच्या सहलीसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, सोमवारी (९ फेब्रुवारी) होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडीवेळी हे सर्व सदस्य एकत्रपणे सभागृहात उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण ६५ जागांपैकी महायुतीने तब्बल ४७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. या घवघवीत यशामुळे शहरातील राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकली असून, सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र महापौर पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग असे जाहीर झाल्याने, भाजपमध्ये महापौरपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती.

भाजपातील तब्बल २७ नगरसेवक महापौरपदासाठी इच्छुक असल्याने, योग्य उमेदवार निश्चित करणे हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठे आव्हान ठरले होते. विविध गट, स्थानिक समीकरणे, अनुभव आणि संघटनात्मक संतुलन यांचा विचार करताना नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागली. अखेर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरपदासाठी उदय धातुंडे, तर उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. या घोषणेनंतर दोन्ही उमेदवारांनी अधिकृतपणे आपले अर्ज दाखल केले.

सहल ‘रणनीतीचा भाग’ म्हणून पाहिली जाते

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये, तसेच सर्व नगरसेवक एकत्र राहावेत या उद्देशाने महायुतीने सहलीचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात ही सहल ‘रणनीतीचा भाग’ म्हणून पाहिली जात असून, निवडीच्या प्रक्रियेत ऐक्य दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक-नगरसेविकांची परस्पर ओळख वाढावी, संघटनात्मक संवाद मजबूत व्हावा आणि निवडणुकीचा ताण काहीसा कमी व्हावा, या हेतूनेही ही सहल आखण्यात आल्याचे समजते. आंबा येथे मुक्कामादरम्यान विविध बैठका, अनौपचारिक चर्चा आणि संवादाचे सत्र होणार असून, सोमवारी सकाळी सर्व नगरसेवक एकत्रपणे इचलकरंजीत परतणार आहेत. त्यानंतर सभागृहात महापौर व उपमहापौर निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे.

सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले

महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने, उदय धातुंडे आणि अनिल डाळ्या यांची निवड औपचारिकता ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदाची निवड ही औपचारीक उरली आहे. याकडे शहरातील नागरिक, राजकीय निरीक्षक आणि प्रशासन यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. नव्या महापौर व उपमहापौरांकडून शहराच्या विकासाला गती देण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून, आगामी काळात इचलकरंजीच्या कारभाराची दिशा काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

नाराजी दूर होणार का?

उदय धातूंडे यांचे नाव महापौरपदासाठी जाहीर होताच काही जेष्ठ नगरसेवकांची नाराजी लपून राहिली नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून काहींनी जाणे पसंत केले. तर एकाने माध्यम प्रतिनिधींसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली. सोमवारी होणाऱ्या महापौर निवडीवेळी या नाराज नगरसेवकांची नाराजी नेत्यांकडून कशी दूर केली जाणार, हे आता पहावे लागणार आहे.

Web Title: The corporators from the mahayuti in ichalkaranji have gone on a two day trip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • BJP
  • Ichalkaranji
  • Ichalkaranji Politics

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.