Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast नंतर कोकण किनारपट्टीवर हालचाली वाढल्या; सुरक्षा दलांनी थेट 525…

केवळ जलमार्गच नव्हे, तर सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2025 | 03:14 PM
Delhi Blast नंतर कोकण किनारपट्टीवर हालचाली वाढल्या; सुरक्षा दलांनी थेट 525…
Follow Us
Close
Follow Us:

राजधानी दिल्लीत सोमवारी झाला भीषण स्फोट 
स्फोटानंतर किनारपट्टीवर हाय अलर्ट 
किनारपट्टीवर बॉम्ब शोधक पथक तैनात

रत्नागिरी: दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या गंभीर घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचे थेट पडसाद आता महाराष्ट्राच्या संवेदनशील अशा कोकण किनारपट्टीवर देखील उमटले असून, संपूर्ण सागरी पट्टयात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील तब्बल ५२५ लैंडिंग पॉईंट ‘संवेदनशील’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलाकडून सागरी किनारी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारी नौकांवर आणि त्यांच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

बॉम्बशोधक पथकही तैनात; कसून तपासणी

केवळ जलमार्गच नव्हे, तर सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून किनारी भागात बॉम्ब शोध पथक व ‘शिवानी’ पथकाकडून देखील सुरक्षा तपासणी केली जात आहे. ही पथके किनारी भागातील संशयास्पद हालचाली आणि वस्तूंची तपासणी करत आहेत. पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहून कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर

राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट  झाला. या स्फोटाने संपूर्ण राजधानी हादरली आहे. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या घटनांमुळे तपास यंत्रणांनाही धक्का बसला आहे. दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून विविध शक्यता लक्षात घेता तपास केला जात आहे. या स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डिटोनेटर कार वापरल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार, प्रयत्न केले जात आहेत.

पोलिस यंत्रणांकडून याचा तपास केला जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानुसार, घटनास्थळावरून 120 कारसह खराब झालेल्या वाहनांचे पुरावे गोळा करण्यात आल्याचे सांगितले. हे पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी कलमांतर्गत उत्तर दिल्लीतील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून विशेष कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेष कक्ष तपासाचे नेतृत्व करेल आणि आवश्यकतेनुसार केंद्रीय संस्थांशीस समन्वय साधला जाईल, असे म्हटले जात आहे.

हे देखील वाचा : Delhi bomb Blast चा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती? साडेतीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत काय काय झालं?

दरम्यान, या तपासाचे नेतृत्व करणारे अधिकारी, विशेष सीपी (विशेष सेल) अनिल शुक्ला हे तेच अधिकारी आहेत, ज्यांनी २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपास पथकाचे नेतृत्व केले होते.

Web Title: Maharashtra konkan high alert mode on after delhi red fort terrorist blast police news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Delhi blast
  • High Alert
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast: ब्रिटनने जारी केली नवीन Travel Warning; भारतातील ‘या’ भागात प्रवास करण्यास सक्त मनाई
1

Delhi Bomb Blast: ब्रिटनने जारी केली नवीन Travel Warning; भारतातील ‘या’ भागात प्रवास करण्यास सक्त मनाई

Delhi Blast नंतर पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये; भुतानवरून येताच थेट दिल्लीतील…
2

Delhi Blast नंतर पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये; भुतानवरून येताच थेट दिल्लीतील…

Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया
3

Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया

Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले…
4

Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.