केवळ जलमार्गच नव्हे, तर सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
हा स्फोट एवढा भीषण होता की याची तीव्रता किंवा याचा परिणाम हा तब्बल 200 मीटरच्या परिसरात जाणवला आहे. त्यामुळे प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही.