Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: ‘गोरगरीबांना १०-१० फेऱ्या कशासाठी?’ बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल; महसूल यंत्रणेची खरडपट्टी

रत्नागिरी एसडीओ स्तरावर २५८ पैकी २२५ प्रकरणे प्रलंबित असून, राजापूर एसडीओकडे १२६ पैकी १०४ प्रकरणे प्रलंबित आहेत. चिंतेची बाब म्हणजे राजापूर उपविभागात १ वर्षपिक्षा जास्त काळ प्रलंबित असलेली तब्बल ८९ प्रकरणे आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 03:02 PM
Ratnagiri News: ‘गोरगरीबांना १०-१० फेऱ्या कशासाठी?’ बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल; महसूल यंत्रणेची खरडपट्टी
Follow Us
Follow Us:
  • महसूलमंत्र्यांच्या तंबीनंतरही शेकडों प्रकरणे अद्याप प्रलंबित
  • महसुल यंत्रणेसमोर अधन्यायालयीन प्रकरणांचा डोंगर
  • राजापुरमध्ये १ वर्षापेक्षा जास्त काळ ८९ प्रकरणे जैसे थै
रत्नागिरी: जिल्ह्यातील न्यायालयीन व महसूल यंत्रणेच्या कारभारावर सध्या प्रचंड ताण असल्याचे चित्र समोर आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व विविध तहसीलदार कार्यालयांच्या स्तरावर तब्बल १२३९ अर्धन्यायायिक प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहेत. न्याय मिळण्याच्या आशेने सर्वसामान्य नागरिक महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून, प्रशासकीय दिरंगाईचा थेट फटका जनतेला बसत आहे. प्रलंबित प्रकरणांच्या वाढत्या तक्रारींमुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

‘गोरगरीबांना १०-१० फेऱ्या कशासाठी मारायला लागतात ?’, असा थेट सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. या बैठकीनंतर आता ही प्रकरणे वेगाने मार्गी लावण्यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. ३० जून २०२६ अखेरची आकडेवारी पाहता, अप्पर जिल्हाधिकारी स्तरावर ५८ प्रकरणे प्रलंबित होती. ज्यात जूनमध्ये १७ नवीन प्रकरणे दाखल होऊन एकूण संख्या ७५ झाली होती. त्यापैकी ३० प्रकरणांचा निपटारा झाला असून सध्या ४५ प्रकरणे शिल्लक आहेत. उपविभागीय अधिकारी स्तरावर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

‘सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार’; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

विविध तालुक्यांमध्ये मोठी रखडलेली प्रकरणे

तहसीलदार कार्यालय स्तरावरील आकडेवारी पाहिली असता, ३० जूनअखेर ७३८ प्रकरणे प्रलंबित होती. जून महिन्यात ८९ नवीन प्रकरणांची भर पडून ही एकूण संख्या ८१९ इतकी झाली होती. प्रशासनाने यातील १२६ प्रकरणांचा निपटारा केला असला, तरी तब्बल ६९३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. तालुका स्तरावर मंडणगड येथे २१ पैकी १६. दापोलीत ९४ पैकी ७६. खेडमध्ये ७२ पैकी ५८ प्रकरणे प्रलंबित आहेत. अपार तहसील (खेड/दापोली) येथे ३९ पैकी ३५, चिपळूणमध्ये ५१ पैकी ४३. गुहागरमध्ये १७ पैकी १४ प्रकरणे रखडली आहेत. रत्नागिरीत २१२ पैकी १६८, तर अपर तहसील (रत्नागिरी। मध्ये ८९ पैकी ६९ प्रकरणे प्रलंबित आहेत, संगमेश्वर तालुक्यात ३४ पैकी ३१, लांजात ७१ पैकी ७१, तर राजापूरात ११९ पैकी ११२ प्रकरणे प्रलंबित आहेत. वर्षभरापासून रखडलेल्या प्रकरणाचे प्रमाणही विविध तालुक्यांमध्ये मोठे असल्याचे अहवालातून कार्यालयात १ वधांपेक्षा जास्त काळ प्रलंबित समोर आले आहे. दापोली व खेड तहसीलदार असलेली प्रत्येकी १२ प्रकरणे आहेत.

Buldhana News: कर्जमुक्तीची अंमलबजावणी करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राजापूर १ वर्षापेक्षा जास्त काळ ८९ प्रकरणे जैसे थै

खेड एसडीओकडे ४० पैकी २८ प्रकरणे आणि चिपळूण एसडीओकडे ९० पैकी ७७ प्रकरणे प्रलंबित पडून आहेत. रत्नागिरी एसडीओ स्तरावर २५८ पैकी २२५ प्रकरणे प्रलंबित असून, राजापूर एसडीओकडे १२६ पैकी १०४ प्रकरणे प्रलंबित आहेत. चिंतेची बाब म्हणजे राजापूर उपविभागात १ वर्षपिक्षा जास्त काळ प्रलंबित असलेली तब्बल ८९ प्रकरणे आहेत.

 

Web Title: Minister chandrashekhar bawankule angry on revenue officers at ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • ratnagiri news
  • Revenue Department

संबंधित बातम्या

‘रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका’; ‘सावजी’वरून बावनकुळे आक्रमक
1

‘रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका’; ‘सावजी’वरून बावनकुळे आक्रमक

Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना
2

Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना

‘सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार’; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा
3

‘सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार’; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Buldhana News: कर्जमुक्तीची अंमलबजावणी करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
4

Buldhana News: कर्जमुक्तीची अंमलबजावणी करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.