
चिपळुणात गर्डर चढविण्याचे काम युद्धपातळीवर
महिनाभरामध्ये चढवले ३२ गर्डर
उड्डाणपुलासाठी मार्च २०२६चा मुहूर्त
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती आली असताना हे कोणत्याही परिस्थितीत मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी चिपळूण उड्डाणपूल येथील जुने पिलर तोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. आता नवीन पिलर कैंप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. तसेच पुलाच्या एकबाजूने गर्डर चढविण्याचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत ३२ गर्डर चढविण्यात यश आले आहे. दोन क्रेनच्या सहाय्याने हे काम युद्धपातळीवर केरले जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.
महिनाभरामध्ये चढवले ३२ गर्डर
यामध्ये पिलर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून एकूण ९५ पिलरपैकी अर्ध्याहून अधिक पिलर कॅपचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. आता उर्वरित पिलर कॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आले असून त्याआधारे महिनाभरात ३२ मर्डर चढविण्यात आले. अजूनही उर्वरित कामासाठी किमान नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मार्च २०२६ पर्यंत है काम पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हद्दीतील पाग पावरहाऊस येथे असलेल्या चौकातून ये जा करताना मोठी कसरत करावी लागते.