
मोठी बातमी! "पर्यटकांच्या सुरक्षेला..."; रत्नागिरीचे कलेक्टर मनुज जिंदल यांचे कडक निर्देश
समुद्र किनारा निसर्गरम्य आणि लाखो पर्यटकांचे आकर्षण
जिल्ह्याधिकारी यांनी दिले प्रमुख निर्देश
सुरक्षिततेला पर्वोच्च प्राधान्य देण्याचे कडक निर्देश
रत्नागिरी: गणपतीपुळे येथील निसर्गरम्य आणि लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक बुडण्याच्या घटनांना कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे कडक निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
प्रशिक्षित ननुष्यबळ, गृहरक्षक दल, पोलिस बंदोबस्त, धोका दर्शक झेंडे, नो-स्विमिंग झोन’ ची स्पष्ट आखणी, तसेच ब्रेथ अॅनालायझर द्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई यासारख्या उपाययोजना तातडीने आणि प्रभावीपणे लागू कराव्यात, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या सातत्याने चडणाऱ्या दुर्दैवी घटनांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
दिवाळी सुट्टीचा घ्या मनसोक्त आनंद! गणपतीपुळेच्या आजूबाजूला असलेल्या ‘या’ ठिकाणांना आवर्जून घ्या भेट
उपायांसाठी ‘तांत्रिक एजन्सी’ नेमण्याची सूचना
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जिंदल यांनी, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना, केवळ तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. यासाठी त्यांनी ‘एखादी तांत्रिक एजन्सी नेमून अभ्यास करावा व त्यामार्फत समुद्रातील धोकादायक प्रवाह, खडकाळ भाग आणि सुरक्षित पोहण्याच्या जागा निश्चित कराव्या’ अशी सूचना केली. या तांत्रिक अभ्यासातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे भविष्यातील उपाययोजनांची दिशा ठरेल.
मद्यपी पर्यटकांवर होणार कठोर दंडात्मक कारवाई
समुद्रात बुडण्याच्या अनेक घटना मद्यपान केलेल्या पर्यटकांसोबत घडतात, हे लक्षात घेऊन जिल्हाधिका-यानी यावर कठोर भूमिका घेतली. त्यांनी गृहरक्षक दल आणि पोलीसांची मदत घेऊन ब्रेथ अॅनालाइझर चा वापर करून मद्यपान केलेल्या पर्यटकावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. मद्यपान करून समुद्रात उतरणाऱ्यांवर जरब बसवणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.
Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय
प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवावे: सध्याच्या जीवरक्षकांच्या संख्येत आणि त्यांच्या प्रशिक्षणाच्या स्तरावर वाढ करणे आवश्यक आहे.
एलईडी स्क्रीन आणि वॉच टॉवर किनाऱ्यावर एलईडी स्क्रीन लावून ‘काय करावे, काय करु नये’ याच्या स्पष्ट सूचना दर्शवाव्यात. तसेच, किनाऱ्यावरील वॉच टॉवरची संख्या वाढवून तेथून सतत लक्ष ठेवण्याची व्यवस्था मजबूत करावी.