दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक कोकणात फिरण्यासाठी येतात. कोकण म्हणजे निसर्ग, समुद्र, शांतता, हिरवीगार झाडी. कोकणचे सौंदर्य पाहून मनाला खूप जास्त आनंद मिळतो. कोकणात गेल्यानंतर तिथे असलेल्या खाद्य संस्कृतीची आस्वाद घेतला जातो. कोकणातील प्रत्येक गावात काहींना काही विशेष गोष्टी दडलेल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक लोक रत्नागिरीमधील गणपतीपुळ्यात जातात. हे महाराष्ट्रातील लोकप्रिय गणपती मंदिरांपैकी एक आहे. त्यामुळे गणपतीपुळ्यात गेल्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या मंदिरांना आणि समुद्र किनाऱ्यांना भेट देऊ शकता. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
गणपतीपुळेच्या आजूबाजूला असलेल्या 'या' ठिकाणांना आवर्जून घ्या भेट

समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं स्वयंभू गणपती मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. स्वच्छ वाळू, शांत लाटा, सुंदर किनारा पाहून मनाला शांतता मिळते. त्यामुळे लाटांच्या आवाजात तुम्ही गणपती दर्शनच आनंद घेऊ शकता.

गुणपती पुळ्यापासून काही मिनिटांवर असलेल्या आरे वारे समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या. आरे वारे बीचवर सूर्यास्ताचं दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

समुद्रकिनारी वसलेला ऐतिहासिक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वारसा जपतो. रत्नागिरी किल्ल्याला भगवती किल्ला असे सुद्धा म्हणतात.

काळी वाळू, निसर्गरम्य झाडी आणि नारळाच्या झाडीमध्ये असलेला मांडवी बीच पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी मांडवी बीच पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात येतात.

गणपतीपुळ्यापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला जयगड समुद्र किनारा आणि जयगड किल्ला कोकणातील अतिशय प्राचीन ठिकाण आहे. जयगड खाडीचा नजारा अतिशय सुंदर दिसतो.






