Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : रत्नागिरी प्रदुषणाच्या वाटेवर? औद्योगिक वसाहतीत ‘मिटेनी’ रासायनिक प्रकल्पामुळे चिंतेचे सावट

इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेली 'मिटेनी एस.पी.ए.' ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत दाखल झालेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 22, 2025 | 03:49 PM
Ratnagiri News : रत्नागिरी प्रदुषणाच्या वाटेवर? औद्योगिक वसाहतीत ‘मिटेनी’ रासायनिक प्रकल्पामुळे चिंतेचे सावट
Follow Us
Close
Follow Us:
  • रत्नागिरी प्रदुषणाच्या वाटेवर?
  • औद्योगिक वसाहतीत ‘मिटेनी’ रासायनिक प्रकल्पामुळे चिंतेचे सावट
रत्नागिरी : इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेली ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत दाखल झाल्याचे समोर येत आहेत.

इटलीतील या कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी करून येथे वापरात आणणार असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याविषयी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

‘मिटेनी’ कंपनी इटलीतील व्हेनेटो प्रांतात पीएफएएस या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन करत होती. ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखली जाणारी ही रसायने निसर्गात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. या उत्पादनामुळे येथील सुमारे साडेतीन लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परिणामी कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले.

या गंभीर प्रकरणानंतर 2018मध्ये कंपनी दिवाळखोर ठरली होती. त्यानंतर जून 2025 मध्ये इटलीतील न्यायालयाने या कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना एकूण 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. असे असताना ही हा प्रकल्प आता लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सुरु करण्याचा घाट राज्य शासनाच्या मदतीने घातला जात असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर, लक्ष्मी ऑरगॅनिक्सने 2019 मध्ये लिलावाद्वारे ‘मिटेनी’ची संपूर्ण यंत्रणा, तंत्रज्ञान आणि पेटंट्स खरेदी केल्याचे समोर आले आहे. इटलीतील कारखाना सुटा करून सुमारे 300 हून अधिक कंटेनर्समधून ही यंत्रसामग्री भारतात आणण्यात आली, अशी माहिती देण्यात येत आहे. हीच यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत ‘यलोस्टोन फाईन केमिकल्स’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात वापरली जात असल्याचा दावा पर्यावरण संघटनांकडून केला जात आहे. 2025 च्या सुरुवातीपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

Ratnagiri News : कोयना जलविद्युत प्रकल्प गळतीमुळे पुरवठा बंद ; गावकऱ्यांना नाहक त्रास

खेड तालुक्यातील लोटे परशुराम परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएस सारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही रसायने एकदा पाण्यात मिसळली की साध्या शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे वेगळी करता येत नाहीत. ती मानवी रक्तात साठून राहतात आणि कर्करोग, थायरॉईड विकार, गर्भवती महिलांमधील गुंतागुंत यांसारख्या समस्या निर्माण होतात.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटींच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतात पीएफएएस रसायनांबाबत स्वतंत्र व कठोर प्रदूषण मर्यादांचा अभाव असल्याने, भारत ‘टॉक्सिक ट्रेड’चा बळी ठरत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. या बाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांबरोबर आता भारतातील सोशल मिडीयाने युरोपमधून हद्दपार झालेले प्रदूषक उद्योग विकसनशील देशांकडे स्थलांतरित होत असल्याचा मुद्दा उचलून धरल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिक, पर्यावरण संस्था आणि कायदेपंडितांकडून या प्रकल्पाच्या पुनरावलोकनाची मागणी होत असून, केंद्र व राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.लोटे येथील या कंपनीचे सद्यस्थितीत काम बंद आहे. या कंपनी विषयी प्रदुषण मंडळाचा अहवाल आल्यावरच राज्य शासनाकडून पुढील निर्णय घेतला जाईल असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीएफएएस (PFAS) रसायने म्हणजे काय?

    Ans: पीएफएएस ही ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखली जाणारी रसायने आहेत. ती निसर्गात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. यामुळे कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व, थायरॉईड समस्या यांचा धोका वाढतो.

  • Que: इटलीत ‘मिटेनी’ प्रकरणात काय झाले होते?

    Ans: मिटेनी’च्या उत्पादनामुळे सुमारे 3.5 लाख नागरिकांचे पिण्याचे पाणी दूषित झाले. यानंतर 2025 मध्ये इटलीतील न्यायालयाने कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना एकूण 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

  • Que: या कंपनीचा भारताशी काय संबंध आहे?

    Ans: भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने 2019 मध्ये ‘मिटेनी’ची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स लिलावाद्वारे खरेदी केली.

Web Title: Ratnagiri news on the path to pollution concerns over miteni chemical project in industrial estate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Ratnagiri

संबंधित बातम्या

रत्नागिरीच्या ‘या’ नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढत; महायुतीला यश, आमदार सामंत ठरले किंगमेकर
1

रत्नागिरीच्या ‘या’ नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढत; महायुतीला यश, आमदार सामंत ठरले किंगमेकर

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा
2

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…
3

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…

Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…
4

Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.