रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचा विजय (फोटो- सोशल मीडिया)
कणकवलीत शहर विकास, मालवणात शिंदेसेना
रत्नागिरीत सेना-भाजपा, राजापूरात काँग्रेस
लोकप्रतिनिधी पुन्हा कारभार सांभाळताना दिसणार
रत्नागिरी: लाडकी बहीण नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भावाच्या मदतीला धावली अशी चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायत यांच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी झाली आणि त्यानंतर जे निकाल बाहे आले त्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची राजकीय पकड मजबूत असल्याचे स्पष् झाले आहे. या निवडणुकीत रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदा तसेच लांजा नगरपंचायतीवर शिंदे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी आहेत त देवरुख आणि गुहागर नगरपंचायतीव भाजपने विजयाच्या रूपाने झेड फडकवला आहे.
या ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. राजापुर नगर परिषदेचा अपवाद वगळता रत्नागिरी जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधी महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीतील घटक काँग्रेसने आपला गड राखला आहे.
“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं
या ठिकाणी काँग्रेसच्या माजी आमदार आणि काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे या विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीवर सर्वांचेच लक्ष होते या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्या जबरदस्त राजकीय ज होती आणि यामध्ये या शहर विकासम आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या निलेश राणे यांना यश मिळाले आहे.
शिवसेना-भाजपा महायुतीला राजापुरात धक्का
रत्नागिरीतही महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून शिवानी सावंत माने वा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवीत होत्या रत्नागिरीतही महाविकास आघाडीमध्ये मतभेद निवडणुकीच्या अखेरच्या टप्यात चव्हाट्यावर आले होते. आणि या सर्व घडामोडीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत तब्बल २९ जागा आणि नगराध्यक्ष पद पटकावले, राजापूर नगरपालिकेत मात्र निकालाचे चित्र वेगळे पाहायला मिळाले, येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चाजी मारत काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. शिवसेना-भाजप महायुतीला राजापूरमध्ये हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगरपंचायत निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजपच्या मृणाल शेटे या नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या आहेत विरोधकांना यावेळी भाजपने धोबीपछाड दिला आहे.






