
बुधवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास कात्रोळी लायकवाडी येथील सुरेश जाधव यांच्या कोंबडीच्या खुराड्यात बिबट्या शिरला होता. हा खुराडा लोखंडी होता. त्याच्या तळ बाजूला असलेला पत्रा फाटलेला होता. त्या मधून बिबट्या आत शिरला. त्यानंतर कोंबड्यांनी आरडा ओरड करायला सुरुवात केली. झोपेत असलेले घरमालक सुरेश जाधवही जागी झाले. त्यांनी लाईट लावून बघितल्यानंतर कोंबड्यांच्या खुराडात बिबट्या असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तत्काळ गावचे सरपंच दीपक निवळकर यांना माहिती दिली. निवळकर यांनी चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान यांना यासंदर्भात कळविले.
त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने वस्तुस्थितीची पाहणी केली आणि कोणत्याही प्रकारे इजा न होता या बिबट्याच्या पिल्लाला रेस्क्यू केलं.या दरम्यान
शेजारील घरातील कोंबड्यांचा खुराडा घरच्या अडचणीच्या बाजूला होता त्याठिकाणी पिंजरा लावणे कठीण होते व खुराड्याची परस्थिती पाहता बिबट्याला जेरबंद करणे आती जोखमीचे ठरत होते. रेस्क्यू टीमने खुराडाच्या तळ बाजूला लाकडी फळ्या एकत्र केल्या. त्या लोखंडी ग्रीलच्या साह्याने बांधून घेऊन लोखंडी खुराडा ग्रामस्थांच्या मदतीने उचलून मोकळ्या जागेवर ठेवला.
नंतर खुराडा समोर पिंजरा लावून खुरड्याचे दार ग्राईंडरच्या मदतीने तोडण्यात आले. परंतु बिबट्या खुराड्यातून बाहेर येऊन पिंजऱ्यात जात नव्हता. अथक प्रयत्नानंतर तो पिंजऱ्यात गेला आणि ग्रामस्थांसह वनविभागाच्या पथकाने सुटकेचा श्वास घेतला.बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कणसे यांनी पाहणी केली असता सदर बिबट्या सुस्थितीत आल्याची खात्री झाल्या नंतर त्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
बुधवारी मध्यरात्री कात्रोळी पैकी लायकवाडी येथील सुरेश जाधव यांच्या कोंबडीच्या खुराड्यात शिरलेला बिबट्याचा पिल्लू हा दहा ते अकरा महिन्याचा होता. या वयातील बिबटे नुकतेच आईपासून विमुक्त होऊन स्वतः शिकारीसाठी बाहेर पडतात. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या बिबट्याची यशस्वी रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे, अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण सरवर खान यांनी सांगितले आहे.
Ans: खुराड्याच्या तळ बाजूला पत्रा फाटलेला असल्याने त्या फटीतून तो आत गेला. बाहेरचा रस्ता सापडत नसल्याने तो अडकून पडला.
Ans: खुराड्यातील कोंबड्यांच्या तीव्र आरडाओरडेमुळे घरमालक जागे झाले. लाईट लावल्यानंतर त्यांना बिबट्या दिसला.
Ans: पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कणसे यांनी तपासणी केली. बिबटा पूर्णपणे सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचे आढळले.