भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (फोटो- सोशल मिडिया)
भाजपाच्या रवींद्र चव्हाणांचे वेंगुर्लेवासीयांना आवाहन
केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एका विचाराचे सरकार
निवडणुकीसाठी करण्यात आलेले प्रचारसभेचे आयोजन
वेंगुर्ले: वेंगुर्लेवासीयांच्या भविष्यासाठी चांगल्या विचारधारेच्या व्यक्तींच्या हातात सत्ता द्या. असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एका विचाराचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विजयी झाल्यास विकासाची सर्व कामे १००% पूर्ण होतील अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी दिली. वेंगुर्ले शहरातील माणिक चौकात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजन गिरप आणि २० नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये २०१४ मध्ये सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या योजना तळागाळात पोहोचल्या. अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य, प्रत्येक गरिबाला हक्काचे घर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मिळाले.
सर्वांच्या मनामध्ये प्रभू राम मंदिराचे असलेले स्वप्न भाजपाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. त्यावेळच्या संकल्प पत्रात असलेले काम भाजपने पूर्ण केले आणि आज भगवा त्यावर फडकवायचा होता तो सुद्ध फडकला आहे. संकल्प पत्रामध्ये नारायण तलाव नव्याने करायचा आहे. एक काम संपले, नाही तन दुसरे काम कसे करावे लागेल, याचा पाठपुरावा गिरप आणि त्यांच्या टीमने करायला सुरुवात केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर
वेंगुर्त्यात चांगली आरोग्यसेवा देणार…
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बैंक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, युवा नेते विशाल परब, तालुकाप्रमुख चंद्रकांत परब, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, महिला तालुकाप्रमुख सुजाता पडवळ, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप, नगरसेवक पदाचे २० उमेदवार, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेंट लुक्सच्या जागेवर हॉस्पिटल उभारणीचा मार्ग चव्हाण यांच्यामुळे मोकळा झालेला आहे. पालकमंत्री म्हणून लक्ष घालून आरोग्य सेवेचा हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन नितेश राणेंनी यावेळी दिले.
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप
शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप
मालवण नगरपरिषदेच्या भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांच जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला आहे. 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्या मराठा होत्या त्यानंतर त्या ओबीसी झाल्या आहेत याबाबत पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Ans: मालवण नगरपरिषदेच्या भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांच जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला आहे.
Ans: वेंगुर्लेवासीयांच्या भविष्यासाठी चांगल्या विचारधारेच्या व्यक्तींच्या हातात सत्ता द्या. असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.






