Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Regal College: चिपळूणमध्ये ‘रिगल’च्या विद्यार्थ्यांचा जल्लोष! ‘पंचम २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा उत्साहात पार

रिगल कॉलेज चिपळूण येथे 'पंचम २०२६' स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात होजगिरी नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर अध्यक्ष संजय शिर्के यांचा राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 08:25 PM
चिपळूणमध्ये 'रिगल'च्या विद्यार्थ्यांचा जल्लोष!

चिपळूणमध्ये 'रिगल'च्या विद्यार्थ्यांचा जल्लोष!

Follow Us
Follow Us:

 

  • चिपळूणमध्ये ‘रिगल’च्या विद्यार्थ्यांचा जल्लोष!
  • ‘पंचम २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन
  • बक्षिस वितरण सोहळा उत्साहात पार
चिपळूण (प्रतिनिधी) : रिगल एजुकेशन सोसायटी संचलित,रिगल कॉलेज चिपळूण या महाविद्यालयात रिगल संस्थेतर्फे विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पंचम २०२६ स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरणाचा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के, संचालक अनिश शिर्के, विराज दळी, महेश सुर्वे तसेच विविध शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य. विभाग प्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय शिर्के यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षण विकासासाठी उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांचा सत्कार संचालक मा.अनिश यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ.सुमिता शिर्के मॅडम यांनी रिगलच्या आतापर्यंतच्या यशाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगतातून रिगलच्या शैक्षणिक चळवळीचे कौतुक करत असताना संजय शिर्के यांच्या सूक्ष्म नियोजनाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना आवडेल ते शिक्षण करा पण कष्टांशिवाय पर्याय नाही असेही सांगितले. संस्थेचे संचालक अनिश शिर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्लब लवकरच सुरु करणार असल्याचे जाहीर केले.तसेच स्पोर्ट्स आणि फिटनेसचे महत्व सांगितले. संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी प्रथम ध्येय निश्चित करून मगच त्यानुसार जाण्याचा सल्ला अ‍ॅलन मस्कचे उदाहरण देऊन दिला.

ZP Election 2026 : अलोरे जिल्हा परिषद गटात दुरंगी तर शिरगाव गटात तिरंगी लढत; युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना रंगणार

पंचम २०२६ च्या सांस्कृतिक कार्यक्रमात एकापेक्षा एक अशी बहारदार नृत्ये सादर करण्यात आली. यामध्ये रिगल कॉलेज चिपळूण च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या होजगिरी नृत्याने प्रथम क्रमांक मिळवला रिगल कॉलेज तळीच्या ब्रह्मकलश नृत्याला द्वितीय तर रिगल कॉलेज कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कालबेलिया या नृत्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच शालेय विभागामध्ये महादेवराव शिर्के माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शेतकरी नृत्याला प्रथम क्रमांक देण्यात आला. रिगल पब्लिक स्कूलच्या सैनिक नृत्याला द्वितीय,तर रिगल पब्लिक स्कूलच्या कठपुतळी नृत्याला तिसरा क्रमांक देण्यात आला. या कार्यक्रमाचे परिक्षण मंगेश सकपाळ यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धामध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.सन २०२५-२६ चा आदर्श कर्मचारी पुरस्कार रिगल कॉलेज महाडच्या प्राचार्या सौ.प्रिया भऊड यांना तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार रिगल कॉलेज चिपळूणच्या कु.श्रद्धा शेट्ये हिला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला विविध महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी,पालक उपस्थित होते. तर रिगल कॉलेजच्या चिपळूण,महाड,आणि तळीच्या फॅशन डिझायनिंग विभागातर्फे सादर करण्यात आलेले फॅशन शो या कार्यक्रमाचे आकर्षण ठरला.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.अमित सुखटणकर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मंदार आवले यांनी केले.

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Web Title: Regal college chiplun pancham 2026 annual gathering awards report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Chiplun
  • College

संबंधित बातम्या

Navarashtra Impact : चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर
1

Navarashtra Impact : चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर

CLAT Exam 2027: वकील किंवा कॉर्पोरेट लॉयर व्हायचंय? जाणून घ्या क्लॅट परीक्षा आणि देशातील टॉप-५ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज
2

CLAT Exam 2027: वकील किंवा कॉर्पोरेट लॉयर व्हायचंय? जाणून घ्या क्लॅट परीक्षा आणि देशातील टॉप-५ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.