Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact : चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर

चिपळूण तालुक्यातील चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील कथित अनियमिततेच्या तक्रारीची दखल घेत कोंकण विभागीय आयुक्त कार्यालयाने १६ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी आयोजित केली आहे. या सुनावणीस जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत आणि तांत्रिक समितीचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 13, 2026 | 02:46 PM
चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर

चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर

Follow Us
Follow Us:
  • चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात
  • तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी
  • अनेक अधिकारी राहणार हजर
निसार शेख, चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील कथित अनियमिततेप्रकरणी कोंकण विभागीय आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘नवराष्ट्र ’ मध्ये (Navarashtra Impact) प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत या प्रकरणातील तक्रारीची दखल १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (V.C.) सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. ही सुनावणी तक्रारदार विद्याधर साळुंखे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने होत असून, या प्रकरणाची विभागीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

Water Crisis Impact : नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू

सुनावणीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन आणि विद्यमान कार्यकारी अभियंते, उपअभियंते, चिवेलीचे तत्कालीन व विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी तसेच तांत्रिक चौकशी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कोंकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विकास शाखेने संबंधित सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तक्रारदार विद्याधर साळुंखे यांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता विभागीय आयुक्त कार्यालयाकडून थेट सुनावणी घेतली जात असल्याने या प्रकरणातील तथ्य समोर येण्याची शक्यता असून, सुनावणीनंतर कोणती प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात आलेली ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेचा उद्देश चिपळूण तालुक्यातील चिवेली गावातील नागरिकांना वर्षभर सुरक्षित, शुद्ध आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत जलस्रोत विकसित करणे, पाणी शुद्धीकरण व्यवस्था उभारणे, साठवण टाक्या (ओव्हरहेड टाक्या) बांधणे, पाईपलाईन टाकणे आणि प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. योजनेची देखभाल आणि व्यवस्थापन ग्रामपंचायत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा समितीमार्फत केले जाते.

सुनावणीनंतर या प्रकरणात चौकशीचा अहवाल, जबाबदारी निश्चित करणे किंवा आवश्यक प्रशासकीय कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी सुरू असून अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

काय आहे ही योजना?

चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात आलेली ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेचा उद्देश चिपळूण तालुक्यातील चिवेली गावातील नागरिकांना वर्षभर सुरक्षित, शुद्ध आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत जलस्रोत विकसित करणे, पाणी शुद्धीकरण व्यवस्था उभारणे, साठवण टाक्या (ओव्हरहेड टाक्या) बांधणे, पाईपलाईन टाकणे आणि प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. योजनेची देखभाल आणि व्यवस्थापन ग्रामपंचायत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा समितीमार्फत केले जाते.

बनकरवाडी-करेवाडी पुलाची डागडुजी; शेळके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

वाद का निर्माण झाला?

या योजनेच्या अंमलबजावणीत कथित आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी पुढील मुद्द्यांवर आक्षेप घेतला आहे.

योजनेच्या कामांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप.

निधीचा वापर आणि कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह.

तांत्रिक नियमांचे पालन झाले का, याबाबत शंका.

योजनेच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेवर प्रश्न.

Web Title: Chiveli rural drinking water scheme irregularities vc hearing konkan divisional commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Chiplun
  • Konkan
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.