
शहरात झालेली विकासकामेच बनली मोठी समस्या
प्रस्ताव न पाठवल्याने धरणाचे काम अर्धवट
भुमिगत वीजवाहिन्या ठरल्या आहेत कुचकामी
राजापूर: शहरात झालेल्या भुमीगत वीजवाहीनीच्या निकृष्ट कामामुळे सर्वत्र लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, सायबाच्या धरणाचे अर्धवट स्थितीतील काम व जागोजागी फुटलेल्या जलवाहीण्या व शहरातील सर्वच रस्त्यांवर असणारे खड्डयांचे साम्राज्य यामुळे गेली २५ वर्ष असणाऱ्या राजापूरच्या समस्या आजही कायम असल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. या निवडणुकीनंतर तरी या समस्या कायमच्या मिटतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या २५ वर्षांत राजापूर शहरात झालेली विकासकामे हीच आज राजापूरकरांची मोठी समस्या बनली आहे. शहरातील मुख्य रस्त्यासाठी सुमारे २ कोटी खर्च झाले असले तरी त्यावर दुसऱ्या वर्षांपासून वेळोवेळी करावा लागणारा खर्च तर शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता विकासकामांवर झालेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी हा नक्की कुणाच्या विकासासाठी झाला ?
Crime News: रात्रीस दरोडा पडे! राजापूरमधील ‘या’ गावात 6 जणांची टोळी थेट घरात घुसली अन्…
प्रस्ताव न पाठवल्याने धरणाचे काम अर्धवट
हे भूमिगत वीजवाहिण्यांचे काम जरी वीज वीतरण कंपणीच्या ठेकेदाराने केले असले तरी ते योग्य रितीने करुन घेण्याचे काम हे तत्कालीन लोकप्रतिनीधींचे होते, मात्र तसे न झाल्याने आजही या भुमीगत वीजवाहिन्या कुचकामी ठरल्या आहेत. आजही शहरवासियांची लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या व गंजलेल्या विद्युत खांबापासुन सुटका झालेली नाही. तर शरातील सर्वच भागातील पथदीप करोडो रुपये खर्च करुनही वेळोवेळी बंद स्थितीतच असतात. मागचा बराच काळ शहरात पथदीप नसल्याने शहरवासियाना अंधारातुनच चालावे लागत आहे.
भुमिगत वीजवाहिन्या ठरल्या आहेत कुचकामी
शहराचा विकास झाला का? व दुरदृष्टीने व योग्य रितीने ही कामे झाली असती तर शहराच्या समस्या का सुटल्या नाहीत?, असा सवाल आता राजापूरकरान्मधु-विचारण्यात येत आहे. राजापूरातील वीजवाहीण्यांच लोंबणारे जाळे संपुष्टात यावे म्हणून केंद्रशासनाच्या माध्यमातून भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी करोड रुपयांचा निधी आला व खर्च झाला.
Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
५ वर्षापुर्वी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सायबाच्या धरणाच्या खालच्या बाजूला नवीन धरण भांधण्यासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा नीधी उपलब्ध करुन दिला असला, तरी दुरदृष्टीच्या अभावामुळे परिपुर्ण न पाठवलेले प्रस्ताव यामुळे या धरणाचे काम आजही अर्धवट स्थितीत आहे. शहरात गेल्या २५, ३० वर्षांत झालेली विकासकामे ही केवळ शोभेची बाहुली बनली असून आज त्या कामांतून उभ्या राहीलेल्या इमारतींची देखभाल करणे आवाक्याबाहेरचे बनले आहे. यावेळी सर्वच राजकिय पक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून निवडून येणारे नव्या दमाचे लोकप्रतीनिधी हे शिवधनुष्य कसे पेलणार?. याकडे राजापरवासियांच्या नजरा लागल्या आहेत.