राजापूरमध्ये दरोड्याचा प्रयत्न (फोटो- istockphoto)
रात्री २ वाजता रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात केली तक्रार
राजापूर -कोळवणखडीत मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न
घरात घुसून लूटमार करण्याचा प्रयत्न
राजापूर: तालुक्यातील कोळवणखडी येथील सदानंद शांताराम मोरे (५५) यांच्या घरात शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे ५ ते ६ दरोडेखोरांच्या टोळक्याने अंधाराचा फायदा घेत थेट घरात घुसून लुटमारीचा प्रयत्न केला. कोयता, धारदार हत्याराने मोरे कुटुंबाला धमकावत ‘पैसे द्या नाही तर जीव गमवावा लागेल!’ अशी धमकी दिली.
अचानक घडलेल्या या घटनेने मोरे कुटुंब भांबावून गेले. रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात दुसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अचानक घरात अनोळखी ५ ते ६ जण घुसलेले पाहून मोरे कुटुंब जागे झाले. कुटुंबाने गोंधळ आरडा ओरडा करतानाच दरोडेखोरांनी घरातीलच कोयता हातात घेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
रात्री २ वा. रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात केली तक्रार
याच दरम्यान मोरे कुटुंबातील ओरडण्याचा आवाजाने आजूबाजूचे गावकरी त्यांच्या घराच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच है टोळकं घाईघाईने अनुस्कुरा मार्गाने गाडीने पसार झाले. रात्रीचा अंधार आणि धूसर नंबर प्लेटमुळे गाडीचे नक्की ठिकाण अथवा वाहनाचा पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे कुटुंबाने सांगितले.
बँक कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटले; तब्बल 25 लाखांची रोकड लंपास, दुचाकी अडवली अन्…
या घटनेची तक्रार सदानंद मोरे यांनी रात्री २ वा. रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात नोंदवली. राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे तपास करत आहेत. चौरीच्या उद्देशाने हा दरोडा टाकण्यात आला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँक कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटले
पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दावरवाडी येथील शाखेत 25 लाखांची रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाठलाग करुन लुटले. पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवून 25 लाखांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी भरदिवसा सकाळी अकरा वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
Nagpur crime: साक्षगंध कार्यक्रमातून उफाळला वाद; जुन्या वैमनस्यातून गोळीबार, एक जखमी
पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून दावरवाडी येथील बँक कर्मचारी गणेश आनंद पहीलवान हे शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता आपल्या स्कुटी दुचाकीवरून (क्रमांक एम एच २० बी झे ८३७४) निघाले होते, पाचोड पैठण रस्त्यावरून येत असताना दावरवाडी शिवारात अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार पाठीमागून भरधाव वेगाने येत त्यांच्या स्कूटीला कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या स्कूटीवर दगड मारून त्यांच्याकडे असणारे रोख 25 लाख रुपये हिसकावून घेतले. या घटनेनंतर गणेश पहेलवान यांनी तत्काळ त्यांच्या शाखा अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची दूरध्वनीवरून माहिती दिली. तसेच चोरट्यांचा काही काळ पाठलागही केला. मात्र, चोरट्यांनी डेरा मार्गी आपला मोर्चा वळून सुसाट वेगामध्ये त्या ठिकाणाहून पळ काढला.
Ans: राजापुरमधील कोळवणखडी येथील मोरेंच्या घरात 6 जणांनी दरोडा टाकला.
Ans: कोयता, धारदार हत्याराने मोरे कुटुंबाला धमकावत 'पैसे द्या नाही तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी देण्यात आली.






