राजापूर बाजारपेठेतील अनेक व्यापारी आपले सामान राजरोसपणे रस्त्यावर ठेवत असल्याने व झड्या दिवसेंदिवस वाढवत असल्याने बाजारपेठेत एखादी अप्रिय घटना घडल्यास बाजारपेठेत अग्निशमन गाडी तरी जाईल का?
कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा मर्यादीत असल्याने पाणी पुरवठयाची सर्व मदार शीळ जॅकवेलवरच अवलंबून असते. तर शीळ जॅकवेलमधून होणार पाणीपुरवठा अनेकदा विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने विस्कळीत होताना दिसतो.