Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 26, 2025 | 09:58 AM
Monsoon Red Alert:

Monsoon Red Alert:

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापूर, धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरूवात
  • सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • हवामान विभागाकडून सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज

 

Solapur, Dharashiv Red Alert:  मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. मागील १५ दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, सोलापूरमधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. दाट ढगांमुळे वातावरणात बदल जाणवू लागला असून, मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त! ज्वेलर्सचे दुकान झाले गजबजलेले, हीच आहे खरेदीसाठी योग्य वेळ

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जयवंत नगर परिसरात पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या भागातील जमीन पाच ते सहा फुटांपर्यंत खचून गेली असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांचे घरदार वाहून गेले असून  मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतशिवार आणि घरदाराचेही वाहून गेली आहे. अद्याप शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेली नाही.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडणाऱ्या चांदणी नदीवरील वाकडी गावातील पुलाचे कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले असूनही या पुलावरून नागरिकांची वाहतूक सुरूच आहे. अपघाताचा धोका कायम असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, “मोठा अपघात झाल्यावरच विभाग जागा होणार का?”असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश, देवीचा मिळेल आशीर्वाद

दरम्यान, सोलापुरात अल्पविरामानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत असून, पुराच्या पाण्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे. वाडकबाळ पुलावरील पाणी अद्याप ओसरलेले नसल्याने सोलापूर–विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंदच आहे. या ठिकाणी महामार्ग तळ्यासारखा दिसत असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, त्यामुळे सीना नदीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. माढा, करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जनावरे आणि घरगुती साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देशही प्रशासनाकडून दिले जाणार आहेत.

Web Title: Red alert another severe thunderstorm in solapur dharashiv next 24 hours are crucial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • Dharashiv News
  • Monsoon News
  • Solapur

संबंधित बातम्या

Dharashiv Collector Kirti Kiran Dance : धाराशिव जिल्हा गेला पाणीखाली वाहून, जिल्हाधिकारी दंग नाचून गाऊन; संतापजनक व्हिडिओ आला समोर
1

Dharashiv Collector Kirti Kiran Dance : धाराशिव जिल्हा गेला पाणीखाली वाहून, जिल्हाधिकारी दंग नाचून गाऊन; संतापजनक व्हिडिओ आला समोर

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल
2

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Girish Mahajan : “मी काही खिशात पैसे घेऊन आलेलो नाही..; पूरग्रस्तांनी मदतीची मागणी करताच गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत
3

Girish Mahajan : “मी काही खिशात पैसे घेऊन आलेलो नाही..; पूरग्रस्तांनी मदतीची मागणी करताच गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी
4

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.