Relaxation in curfew rules imposed after Nagpur riots
नागपूर : नागपूरमधील महाल या परिसरामध्ये दंगल झाली. यामध्ये एका संतप्त जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. यामध्ये पोलिसांवर देखील जमावाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये 34 पोलीस जखमी झाले तर एका महिला पोलिसांचा विनयभंग देखील करण्यात आला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन ही दंगल झाली असून यावरुन राजकारण्यांदेखील आक्रमक भूमिका घेतली. यामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे दुकांनासह शाळा आणि नागरिकांच्या वावरावर देखील बंधने होती. आता परिस्थिती निवळ्यामुळे नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागपूरमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेत नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी सोमवारपासून (दि.17) शहरातील 11 भागांमध्ये संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली होती. मात्र, दंगलीच्या पाचव्या दिवशी परिस्थिती निवळली आहे. यामुळे आज पोलीस आयुक्तांनी 11 पैकी नऊ भागातील संचारबंदी शिथिल केली आहे. तर उर्वरित तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी अद्यापही कायम आहे. यामुळे अनेकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा