Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News: बीडकरांना मिळाला दिलासा! विकासकामांना गती देणार; नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची हमी

बीड नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २७५ कोटी ४ लाख ५० हजार रूपयांच्या उत्पन्नाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणतीही कर वाढ आणि दर वाढ न करता बीड शहरातील नागरीकांना दिलासा देणारा आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 06, 2026 | 11:28 AM
Beed News: बीडकरांना मिळाला दिलासा! विकासकामांना गती देणार; नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची हमी (photo-social media)

Beed News: बीडकरांना मिळाला दिलासा! विकासकामांना गती देणार; नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची हमी (photo-social media)

Follow Us
Close
Follow Us:

Beed News: बीड नगर परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २७५ कोटी ४ लाख ५० हजार रूपयांच्या उत्पन्नाचे उध्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कोणतीही कर वाढ आणि दर वाढ न करता बीड शहरातील नागरीकांना दिलासा देणारा, शहराच्या सर्वांगिण विकासाचा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सर्व समावेशक अंदाजपत्रकाच्या माध्यमातून बीड नगर परिषदेने विकासाकडे वाटचाल सुरू केली असुन आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकास कामांना गती मिळेल अशी माहिती नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी दिली आहे.

या अर्थसंकल्पीय सभेला उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती विनोद मुळूक, स्वच्छता सभापती शेख निजाम, बांधकाम सभापती संजय उडाण, नियोजन सभापती बाळासाहेब गुंजाळ, महिला व बालकल्याण सभापती आरती रंजित बनसोडे, गटनेते फारूख पटेल, गटनेते खुर्शीद आलम, गटनेत्या सारिका क्षीरसागर व स्थायी समितीचे सर्व सदस्य, मुख्याधिकारी शैलेश फडसे, सर्व नगरसेवक, पालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमातून बीड नगर परिषद निवडणूकीत यश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय विशेष सभा पार पडली आहे.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर मौलाना आझाद विकास आघाडीच्या ध्यमातून बीड शहराच्या विकासाचा ध्यास घेण्यात आलेला आहे. बीड नगर परिषदेच्या गोपीनाथरावजी मुंडे सभागृहामध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या मान्यतेच्या विशेष सभेत नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी सन २०२६-२७ या वर्षासाठीचा अंदाजपत्रक आराखडा सभागृहासमोर मांडला. यात कोणतीही कर वाढ आणि दर वाढ न करता बीड शहरातील पायाभुत सुविधा आणि सर्व समावेशक विकासकामाला प्राधान्य देण्यात आल्याने सदस्यांनी या अंदाजपत्रकास सहमती दिली आहे.

विकासकामे, आस्थापना खर्च आरोग्य सेवा, दिवाबत्ती आणि पाणी पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर नगर परिषद २७४ कोटी ९९ लाख रूपये खर्च करणार आहे. या नियोजित खर्चानंतरही ७ लाख ५० हजारांची शिल्लक रक्कम पालिकेकडे असणार आहे. भांडवली जमा रकमेचा मोठा हिस्सा १५७ कोटी ८२ लक्ष हा शहरातील रस्ते, नाली बांधकाम आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. महसुली उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार आणि दैनंदिन स्वच्छतेची कामे पूर्ण केली जातील. हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वागिण विकासासाठी दिशादर्शक असून या माध्यमातून विकासाचा संकल्प केल्याचे नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी सांगितले आहे.

विशेष अर्थसंकल्पीय सभा झाल्यानंतर सर्व साधारण सभा सुरू झाली. स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन, बांधकाम यासह सर्व विभागांकडून मोठ्या प्रमाणात विषय असल्याने सभागृहातील सर्व सदस्यांना चर्चेसाठी नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी संधी दिली. यातील अनेक सदस्यांना प्रश्न मांडत असताना वेळ पुरला नसल्याने पुन्हा खंडीत केलेली सर्व साधारणसभा पुन्हा सुरू झाली. या सर्व साधारण सभेमध्ये शहरातील विविध भागातील नगरसेवक आपले प्रश्न मांडत असुन त्यावर मार्ग काढण्याच्या सुचना नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्याकडून पालिका प्रशासनाला देण्यात येत आहेत.

Web Title: Relief for beedkars development works will be accelerated mayor premlata parve assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Politics
  • Budget 2026-2027

संबंधित बातम्या

Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद
1

Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 
2

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा
3

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत
4

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.