
भाताचा खरेदी दर घ्या जाणून
शहापूर/नरेश जाधव: अवकाळी पावसापासून वाचवलेल्या भाताची शासनाने लवकरात लवकर खरेदी करावी यासाठी शेतकरी शहापूर येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारून हैराण झाला असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने खाजगी व्यापारी कवडीमोल भावात भात खरेदी करीत आहेत.
शासनाच्या हमीभावानुसार भात विक्रीसाठी शेतकऱ्याकडे अॅग्रिस्टॅक व फार्मर आयडी असेल त्यालाच केंद्राकडे नोंदणी करता येईल. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक अडचणीची होणार आहे. कारण शेतकऱ्यांना आता भात विक्रीसाठी भात खरेदी सुरू झाल्यापासून किसान अॅपद्वारे किमान तीन दिवस आधी विक्रीची तारीख (स्लॉट) बुक करावी लागणार आहे.
‘एकरी 7 ते 8 कोटी दिले तरच भूसंपादनास परवानगी देणार’; पुरंदरचे शेतकरी आक्रमक
भात खरेदीच्या प्रक्रियेत नियम लागू होणार
तीन दिवस आधी विक्रीची तारीख बुक करावी लागेल
हमीभावानुसार भात विकण्यासाठी शेतकऱ्याला अॅग्रिस्टॅक, फार्मर आयडी असेल तरच त्या शेतकऱ्याला केंद्रावर नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया क्लिष्ट होणार आहे. शेतकऱ्यांना आता भात विक्रीसाठी किमान तीन दिवस आधी विक्रीची तारीख बुक करावी लागेल. केंद्र सरकारने या खरीप हंगामासाठी योग्य सरकारी गुणवत्ता असलेल्या भातासाठी २ हजार ३८९ रुपये, तर सी ग्रेडसाठी प्रतिक्विंटल २ हजार ६९ रुपये हमीभाव निश्चित केला. पण, व्यापाऱ्यांकडून सध्या क्विंटलला 1200 ते 1300 रुपये दराने खरेदी सुरू आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर भातासह अन्य शेतमाल खरेदी करताना भात नोंदणीसाठी अॅग्रिस्टॅक व फार्मर आयडी यांच्यासह केंद्रात मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बोगसगिरीला आळा बसेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
Farmers News: शेतकऱ्यांचे गणित बिघडले! कांदा लागवडीत मजुरी खर्च आकाशाला भिडला
सद्यस्थितीत शेतकरी अवकाळी पावसामुळे उरलासुरले भातपीक शासनाने खरेदी करावे यासाठी हेलपाटे मारत आहे परंतु खरेदी केंद्र उशिरा सुरू होणार असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने तो भात कवडीमोल भावाने खाजगी व्यापाऱ्याऱ्यांना विकत आहेत यासाठी शासनाने खरेदी केंद्र लवकर सुरू करावे – महेश दिनकर, युवा तालुकाधिकारी शहापूर (उबाठा) केंद्रावर भात खरेदी नोदणीसाठी अॅग्रिस्टॅक व फार्मर आयडी गरजेची असून ४ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०२६ दरम्यान शेतकऱ्यांना भात केंद्रावर विकता येणार आहे. भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कर्मचारी, जागा, साहित्य या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन केंद्र लवकरच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे – तुषार वाघ, उपप्रादेशिक व्यवस्थापक