प्रचंड ऊन वाढलं आहे. गरमीने सगळेच त्रस्त पाहायला मिळत आहेत. तर अनेकांच्या शरिरात नेहमीच उष्णता असते. अशा लोकांना या सुरू होणाऱ्या उन्हाळ्याने फारच त्रास होतो. उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी दही भात खाणे हा एक चांगला पर्याय आहे. हा दही – भात (recipe of curd rice) कसा बनवायचा हे आपण पाहूयात.
साहित्य – १ कप तांदूळ, १०-१२ पाने कडीपत्ता, १/२ चमचा मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ कप दही, चिमूटभर हिंग, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे, फोडणीसाठी तेल
कृती- सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या. एका तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात कडीपत्ता मोहरी, हिंग,घालून फोडणी तयार करा. आता शिजवलेल्या भातात दही,मीठ आणि कोथिंबीर मिसळून वरून ही फोडणी ओतून द्या. दही भात तयार. आवडीनुसार थोडी साखरही घेऊ शकता. फोडणी आवडत नसल्यास घातली नाही तरी चालेल.






