Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा’; रोहित पवार यांचा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला

अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन रोहित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 13, 2024 | 01:02 PM
‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा’; रोहित पवार यांचा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेला अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक आहे. त्यासाठी उमेदवार देण्याबाबत अजित पवार गटामध्ये अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर आज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस असताना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार रंगलेली असून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे.

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

अजित पवार गटाकडून राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्यामुळे शरद पवार गटाने टीकेची झोड उठवली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खोचक टीका केली. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरूय… म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना Advance मध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!!!” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती… — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2024

लोकसभेनंतर आता राज्यसभा

लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही पवार कुटुंबातील दोन उमेदवारांमध्ये प्रतिष्ठेची लढाई झाली. मात्र सुप्रिया सुळे यांनी लाखांच्या मतांनी बारामतीचा गड राखला. यानंतर आता सुनेत्रा पवार या मागच्या दाराने संसदेमध्ये जाणार आहेत. लोकसभेमध्ये पराभूत झाल्या असल्या तरी सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार होणार आहेत.

Web Title: Rohit pawar target for ajit pawar group choose sunetra pawar as rajyasabha elections candidate political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • Sunetra Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.