
निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त (Photo Credit- X)
नेमकी कारवाई कशी झाली?
पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ३ (SST Team) द्वारे कामोठे चेकनाक्यावर वाहनांची नियमित तपासणी सुरू होती. यावेळी सायन-पनवेल हायवेवरून जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ‘ग्रँड विटारा’ गाडीची तपासणी करण्यात आली. गाडीची झडती घेतली असता, एका कापडी पिशवीत १७ लाख रुपये रोख आढळले. या रकमेबाबत समाधानकारक पुरावे न मिळाल्याने पथकाने ही रक्कम तात्काळ जप्त केली.
प्रशासकीय यंत्रणा सतर्क
ही कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. महेशकुमार मेघमाळे: अतिरिक्त आयुक्त तथा आचारसंहिता पथक प्रमुख रविकिरण घोडके: उपायुक्त तथा समन्वय अधिकारी आणि सुदिन धनाजी पाटील पथक प्रमुख (SST), तसेच कामोठे पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि पथकाचे इतर सदस्य उपस्थित होते.
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान
पुढील तपास प्राप्तिकर विभागाकडे
जप्त केलेली रक्कम संशयास्पद असल्याने, निवडणूक नियमांनुसार ही माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. आयकर विभाग आता या पैशांचा स्त्रोत आणि त्याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, याचा सखोल तपास करत आहे.
निवडणूक पथकांचा कडक पहारा
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भरारी पथके व्हिडिओ व्हिव्हिंग पथके आणि स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि पैशांचा गैरवापर टाळला जावा, यासाठी सर्व पथकांना २४ तास सतर्क राहून कडक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Panvel-Karjat Local : अवघ्या 30 मिनिटांत पनवेल- कर्जत लोकल प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या…