Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

पनवेलमध्ये पळस्पे फाटा येथे द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे उद्घाटन अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते झाले. या शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांना विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 08:59 PM
द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

Follow Us
Follow Us:
  • पनवेलमध्ये द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे उद्घाटन
  • अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन
  • साड्यांपासून मेन्स वेअरपर्यंत, सगळ्या वस्तू मिळणार एकाच ठिकाणी
पळस्पे फाटा येथे उभारण्यात आलेल्या द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे उद्घाटन रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला स्थानिक नागरिक, महिला, तरुणाई तसेच व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

व्यवसायिक वीरेंद्र जगे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या भव्य शॉपिंग सेंटरमध्ये ग्राहकांसाठी विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साड्या, दागिने, बॅग-पर्स, लहान मुला-मुलींचे कपडे, किड्स वेअर, महिलांचे परिधान, मेन्स वेअर तसेच इतर आकर्षक वस्तू वाजवी दरात उपलब्ध असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. पळस्पे फाटा येथे डी-मार्टच्या शेजारी असलेले हे शॉपिंग सेंटर परिसरातील नागरिकांसाठी खरेदीचे नवे आकर्षण ठरत आहे.

Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

“मराठी उद्योजक पुढे येताना पाहून आनंद”

उद्घाटन प्रसंगी बोलताना अभिनेत्री अक्षया देवधर यांनी मराठी उद्योजक व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पुढे येत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. “ग्राहकांना सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळाल्याने वेळ आणि खर्चाची बचत होईल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे,” असे त्या म्हणाल्या.

सध्या या मॉलमध्ये सुमारे २०० जणांना रोजगार उपलब्ध झाला असून, भविष्यात हा आकडा २००० पर्यंत वाढवण्याचा मानस असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे स्थानिक युवक-युवतींसाठी हा प्रकल्प रोजगाराचे मोठे व्यासपीठ ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

अध्यात्मिक वातावरणाची जोड

द्वारकाधीश शॉपिंग सेंटरमध्ये श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्यात आले असून उद्घाटनावेळी विधिवत पूजन व आरती करण्यात आली. व्यवसायासोबत अध्यात्मिक वातावरणाची सांगड घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी

कार्यक्रमानंतर अभिनेत्री अक्षया देवधर यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी महिलांनी व तरुणांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष रंगत आली.

पनवेल परिसरातील नागरिकांनी या नव्या शॉपिंग सेंटरला भेट देऊन खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पळस्पे फाटा परिसरातील व्यापारी हालचालींना या मॉलमुळे नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Dwarkadhish shopping center mall inaugurated by actress akshaya deodhar in panvel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • panvel

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.