Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhaiyyaji Joshi : वादग्रस्त वक्तव्यावर अखेर भय्याजी जोशींचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘माझी मातृभाषा…’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलंं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 06, 2025 | 09:46 PM
वादग्रस्त वक्तव्यावर अखेर भैय्याजी जोशींचं स्पष्टीकरण, म्हणाले, माझी मातृभाषा...

वादग्रस्त वक्तव्यावर अखेर भैय्याजी जोशींचं स्पष्टीकरण, म्हणाले, माझी मातृभाषा...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलंं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. भैय्याजी जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार तसंच काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या विषयावर पत्रक काढत नाराजी व्यक्त केली होती.

‘मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत कोणतंही दुमत नाही. माझी मातृभाषा मराठी आहे. पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचाही आदर करतो… सर्वांना याच दृष्टिकोनातून पाहण्याची विनंती करतो, असं स्पष्टीकरण भय्याजी जोशी यांनी दिलं आहे.

#WATCH | Mumbai: On row over his statement, RSS leader Bhaiyyaji Joshi says, “Due to one of my statements, a misunderstanding has occurred. There is no question that the language of Mumbai is not Marathi. The language of Maharashtra is Marathi. Mumbai is in Maharashtra and… pic.twitter.com/1dS7kj90sa — ANI (@ANI) March 6, 2025

काय म्हणाले भय्याजी?

‘माझ्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे. मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत कोणतेही दुमत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि स्वाभाविकच मुंबईची भाषा मराठी आहे. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. मुंबईतही विविध भाषा बोलणारे लोक राहतात.त्यामुळे त्यांनीही इथे यावे आणि मराठी शिकावे, मराठी समजून घ्यावे, मराठी वाचावे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे.

मला वाटते की भारतात इतक्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात हे सहअस्तित्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. मुंबई हे त्याचे आदर्श उदाहरण आहे असे मला वाटते. पण मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजावे, मराठी बोलावे, मराठी शिकावे, मराठी वाचावे, अशी स्वाभाविक अपेक्षा असते. मला यापेक्षा अधिक काही सांगायचे नाही… माझी मातृभाषा मराठी आहे. पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचाही आदर करतो… सर्वांना याच दृष्टिकोनातून पाहण्याची विनंती करतो,’ असं स्पष्टीकरण भैय्याजी यांनी दिलं.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर विधिमंडळात स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मराठी ही मुंबई, महाराष्ट्र आणि राज्य सरकारची भाषा असून, येथे राहणाऱ्या लोकांनी ती स्वीकारली पाहिजे. मराठी भाषा ही राज्याच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा एक भाग आहे आणि ती शिकणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा आदर आणि जतन केला जाईल आणि ती आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Web Title: Rss leader bhaiyyaji joshi clarify on marathi language controversy all over maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi Bhasha Gaurav Din
  • RSS

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
3

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
4

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.