Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरटीई’ प्रवेशाच्या नियमाने वाढली डोकेदुखी; आता शिक्षणावर गदा?

मागील वर्षीच्या तुलनेत बदल करण्यात आल्याने हा बदललेला नियम लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आली असून विद्यार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2026 | 03:19 PM
'आरटीई' प्रवेशाच्या नियमाने वाढली डोकेदुखी !

'आरटीई' प्रवेशाच्या नियमाने वाढली डोकेदुखी !

Follow Us
Close
Follow Us:

कोरपना : महाराष्ट्र सरकारकडून २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी (आरटीई) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत बदल करण्यात आल्याने हा बदललेला नियम लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आली असून विद्यार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये गोंधळ आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन निकषांनुसार आता विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या गुगल मॅप लोकेशननुसार केवळ १ किलोमीटरच्या परिसरातील शाळांमध्येच आरटीई अंतर्गत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ३ किलोमीटरपर्यंत होती. त्यामुळे पालकांना शाळा निवडण्याचा अधिक पर्याय उपलब्ध होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका गोरगरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे दिसून येत आहे. अनेक नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा १ किमीच्या बाहेर असल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी, शिक्षणातील समान संधीचा मुलभूत अधिकार बाधित होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपूर्वीही सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित शाळा आरटी योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पालकांचा तीव्र विरोधानंतर शासनाला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एका बाजूला ‘लाडकी बहीण योजना’ सारख्या योजना राबवून शासन जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असताना, दुसऱ्या बाजूला शिक्षणापासून दूर ठेवणारे नियम लागू करणे ही विसंगती असल्याची टीका केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आरटीई कायद्याचा मुख्य उद्देश सर्वांना समान व दर्जेदार शिक्षणाची संधी देणे हा आहे. मात्र नवीन १ किलो मीटर अट ही त्या उद्देशालाच बाधा आणणारी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. जर शासनाने तत्काळ या निर्णयाचा पुनर्विचार केला नाही, तर हजारो गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासनाने आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेच्या निकषात बदल करून सर्वसामान्य का सर्वसा गोरगरीब व वंचित घटकातील मुलांना उच्च दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला असल्याची टीका होत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शाळेजवळ भाड्याने घर घेऊन राहावे लागेल. या निकषात तात्काळ बदल करण्याची गरज आहे.

– अभय मुनोत, नांदा

Web Title: Rte admission rules increase headaches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Maharashtra Education
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर
1

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा; ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फटका बसणार?
2

राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा; ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फटका बसणार?

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
3

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात
4

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.