Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

जिल्ह्यातील मिरज, मनपा सांगली आणि वाळवा तालुक्यांत सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. वाळवा तालुक्यात ४९ शाळांमध्ये ४५३ जागा, मनपा सांगली क्षेत्रात ३४ शाळांमध्ये ४६७ जागा, तर मिरज तालुक्यात ३१ शाळांमध्ये ३२३ जागा उपलब्ध आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 17, 2026 | 10:44 AM
RTE प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात; 10 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

RTE प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात; 10 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

Follow Us
Follow Us:
  • सांगलीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सुरू
  • जिल्ह्यातील एकूण २११ पात्र शाळांमध्ये २०९७ जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवणार
  • जिल्ह्यातील मिरज, मनपा सांगली आणि वाळवा तालुक्यांत सर्वाधिक जागा उपलब्ध
 

Sangli RTE Admission Opens :   बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सांगली जिल्ह्यात आज १७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून १० मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पालकांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी केले आहे. (Right to Education) 

जिल्ह्यातील एकूण २११ पात्र शाळांमध्ये २०९७ जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC), दिव्यांग, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालके, अनाथ तसेच कोविड काळात पालक गमावलेल्या बालकांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी) कुटुंबांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Educational News) 

तालुकानिहाय उपलब्ध जागा

जिल्ह्यातील मिरज, मनपा सांगली आणि वाळवा तालुक्यांत सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. वाळवा तालुक्यात ४९ शाळांमध्ये ४५३ जागा, मनपा सांगली क्षेत्रात ३४ शाळांमध्ये ४६७ जागा, तर मिरज तालुक्यात ३१ शाळांमध्ये ३२३ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय जत (१७०), पलूस (१९०), कवठेमहांकाळ (१२५), खानापूर (८६), तासगाव (१०९), आटपाडी (६३), शिराळा (५२) व कडेगाव (५९) येथेही जागा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

लष्कराच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल, व्यवसायिक शिक्षणधारकांसाठी नवी संधी; आता टेक्निकल अग्निवीर बनता येणार!

आवश्यक कागदपत्रे अनिवार्य

अर्ज भरताना पालकांचे आधारकार्ड, बालकाचा जन्म दाखला, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), उत्पन्न दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

” ऑनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित केला जाणार असून त्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. पालकांनी एकच अर्ज अचूक माहितींसह भरावा, अपूर्ण किंवा चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो.”

-मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, सांगली

 

Web Title: Online rte admissions for 2097 seats in 211 schools in sangli start from today know the application process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Educational News
  • Maharashtra Education
  • Right To Education Act

संबंधित बातम्या

Shalarth ID Scam: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन!
1

Shalarth ID Scam: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.