Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahim Constituency: माहीमची लढत बिनविरोध नाहीच; सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम

दिवाळीच्या दारात कुणाच्या दारात जाऊन, आपल्याच कार्यकर्त्यांना आणि माता भगिनींना गुंतवून ठेवणे, हे मला पटत नाही. तरीही माझ्या आज तीन चार बैठका आहेत, मी वर्षा बंगल्यावर गेलो पण मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 01, 2024 | 01:31 PM
Mahim Constituency: माहीमची लढत बिनविरोध नाहीच; सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे  मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, अमित ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका  महायुतीने घेतली आहे. महायुतीतील शिंदे गट आणि भाजपच्या काही नेत्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली आहे. पण या जागेवरून शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी अर्ज भरला असून माहीममधून माघार घेण्यास विरोध केला  आहे.

यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागले असताना, सदा सरवणकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ” कोणत्याही परिस्थितीत मी माहीत मतदारसंघातून माघार घेणार नाही, मी विधानसभेची निवडणूक लढवणारच  आहे. मी वेळोवेळी सांगितले आहे. माघार घेण्याचा प्रश्नच उरत नाही. मला एबी फॉर्मही दिला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी फॉर्म भरला आहे आणि   निवडणूकही लढवणार  आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: ‘रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करतात, आमचा फोन…’ , महाराष्ट्राच्या डीजीपीवर संजय राऊतांचा आरोप

सरवणकर म्हणाले,  दिवाळीच्या दारात कुणाच्या दारात जाऊन, आपल्याच कार्यकर्त्यांना आणि माता भगिनींना गुंतवून ठेवणे, हे मला पटत नाही. तरीही माझ्या आज तीन चार बैठका आहेत, मी वर्षा बंगल्यावर गेलो पण मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही, काही छोटी-मोठी कामे असतात, आमदार म्हणून ती इतर स्टाफच्या माध्यमातून होतात. दरवेळी मुख्यमंत्र्यांना भेटणे गरजेचेच नसते. असेही सरवण करांनी स्पष्ट केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले होते. त्यावरही सदा सरवणकरांनी  राज ठाकरेंवर टीका केली.  ज्याचा एकही आमदार नाही,त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे हास्यास्पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महायुती घेईल, असा टोला सरवणकरांनी लगावला होता.

हेही वाचा:  अमित ठाकरे लागले प्रचाराला! बायकोसह दिल्या मतदारांच्या घरी भेटी

तर, दिवंगत बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवली नाही, त्यांनी नेहमी शिवसैनिकाला मोठं केलं राज ठाकरे यांच्याकडे आम्ही बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून पाहतो. राज ठाकरे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा आहे. म्हणून मी राज ठाकरेंना भेटून विनंती करणार आहे. मागील 30 वर्षांपासून माझं आणि मतदारसंघाचे आई-मुलासारखं नातं आहे. ते अबाधित ठेवण्यासाठी मी वेळ मागितली आहे.  असेही सरवणकरांनी म्हटलं आहे.

Web Title: Sada saravankar is determined to contest elections against amit thackeray in mahim constituency nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Maharashtra Assembly election 2024
  • Sada Sarvankar

संबंधित बातम्या

‘मराठी’ने घडवली राज्याच्या भविष्याची गळाभेट; अमित अन् आदित्यची जोडी करणार कमाल? वाचा सविस्तर…
1

‘मराठी’ने घडवली राज्याच्या भविष्याची गळाभेट; अमित अन् आदित्यची जोडी करणार कमाल? वाचा सविस्तर…

MNS In BMC : मुंबई महापालिकेसाठी मनसेची जोरदार खेळी; तरुण नेतृत्व अमित ठाकरे उतरले मैदानात
2

MNS In BMC : मुंबई महापालिकेसाठी मनसेची जोरदार खेळी; तरुण नेतृत्व अमित ठाकरे उतरले मैदानात

“युद्धबंदी म्हणजे विजय नव्हे…; कॉंग्रेसनेही दिला मनसेने नेते अमित ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा
3

“युद्धबंदी म्हणजे विजय नव्हे…; कॉंग्रेसनेही दिला मनसेने नेते अमित ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा

“आपला विजय झालेला नाही…; देशातील विजयोत्सवानंतर अमित ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
4

“आपला विजय झालेला नाही…; देशातील विजयोत्सवानंतर अमित ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.